Navegaon Nagzira Tiger Reserve Madhavzari Gate
नवेगाव-नागझिराच्या ‘माधवझरी’ प्रवेशद्वारावरून जंगल सफारी व निसर्ग पायवाट सुरू!  Navegaon Nagzira Tiger Reserve

नवेगाव-नागझिराच्या ‘माधवझरी’ प्रवेशद्वारावरून जंगल सफारी व निसर्ग पायवाट सुरू! Navegaon Nagzira Tiger Reserve

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील Navegaon Nagzira Tiger Reserve झाशीनगर वनपरिक्षेत्रांतर्गत येणारे माधवझरी प्रवेशद्वार पर्यटकांसाठी अधिकृतपणे खुले करण्यात आले आहे. शुक्रवार, ५ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून या गेटवरून जंगल सफारी आणि निसर्ग पायवाटेला (Nature Trail) उत्साहात सुरुवात झाली. या नव्या प्रवेशद्वारामुळे निसर्गप्रेमींना आता पावसाळ्यातही जंगलाचा आनंद लुटता येणार आहे.

या पर्यटन केंद्राचे उद्घाटन राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे (NTCA) सहाय्यक महानिरीक्षक (AIG) नंदकिशोर काळे, व्याघ्र प्रकल्पाच्या संचालिका पियूषा जगताप आणि गोंदियाचे जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रीतमसिंग कोडपे आणि अतुल देवकर यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर सर्व मान्यवर आणि कर्मचाऱ्यांनी ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेअंतर्गत परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण दिनाचा संदेश दिला.

पावसाळ्यातही सफारी राहणार सुरू; स्थानिकांना रोजगार
माधवझरी हे पर्यटन केंद्र नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानालगत असून, हे क्षेत्र व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर झोन’मध्ये (Buffer Zone) येते. कोर क्षेत्रातील (Core Area) सफारी पावसाळ्यात बंद होत असली, तरी बफर क्षेत्रातील हे केंद्र पावसाळ्यातही पर्यटकांसाठी सुरू राहणार आहे, हे या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पाचे मोठे आकर्षण आहे. या पर्यटन विकासामुळे वन्यजीव संवर्धनासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागला आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक गावकऱ्यांसाठी ‘उपहारगृह’ (Canteen) आणि ‘वस्तू विक्री केंद्र’ सुरू करण्यात आले असून, यामुळे स्थानिकांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

संशोधक आणि निसर्गप्रेमींसाठी पर्वणी
माधवझरी हे ठिकाण अत्यंत समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते. घनदाट जंगल, वन्यप्राण्यांचा वावर, दुर्मिळ पक्षी आणि विविध औषधी वनस्पतींचा साठा येथे असल्याने हे उद्यान पर्यटक आणि वन्यजीव निरीक्षकांसोबतच संशोधकांसाठीही अभ्यासाचे एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!