Geminid Ursid Meteor Shower Winter Solstice
डिसेंबर महिन्यातील आकाश:  उल्कावर्षाव-धुमकेतू-ग्रह-चंद्र युती Geminid Ursid Meteor Shower Winter Solstice

डिसेंबर महिन्यात २ महत्वाचे उल्कावर्षाव, १ धुमकेतू आणि अनेक ग्रह-चंद्राची युती पाहण्याची संधि मिळणार आहे. २०२३ वर्षांतील ह्या शेवटच्या खगोलीय घटना राहणार असून खगोल निरीक्षकांना सुवर्ण संधी असेल. सर्वानी या खगोलीय घटनांना अवश्य पाहावे असे आवाहन असे आवाहन  खगोल अभ्यासक प्रा सुरेश चोपणे यांनी केले आहे.

१४ डिसेंबर ला Geminid Meteor Shower

डिसेंबर महिन्यात एकूण ६ उल्कावर्षाव होत असले तरी जेमिनिड उल्कावर्षाव हा सर्वाधिक मोठा उल्कावर्षाव मानला जातो. खरं तर हा उल्कावर्षाव ४ ते १७ डिसेंबर पर्यंत दिसतो परंतु सर्वाधिक ताशी १००-१३० उल्का या १४ डिसेंबर ला दिसण्याची शक्यता असते. जेमिनी तारासमूहात हा उल्कावर्षाव कमी अधिक दरवर्षी दिसतो. पूर्वेला रात्री ८ वाजेपासून तर पहाटे पर्यंत जरी दिसत असला तरी उल्कावर्षावाचे सर्वाधिक प्रमाण रात्री १ ते २ वाजेपर्यंत दिसेल. अस्टेरॉईड ३२०० फेथॉन 3200 Phaethon ह्या ग्रहिके मुळे हा उल्कावर्षाव दिसतो. पाठीवर झोपून साध्या डोळ्याने पाहिल्यास चांगली निरीक्षणे नोंदविता येतील. द्विनेत्रीं/दुर्बिणीची गरज नसते. खगोल निरीक्षकानी आवश्य हा उल्कावर्षाव पहावा असे आवाहन स्काय वॉच गृप तर्फे करण्यात येत आहे.

हेही वाचा: CHUKRASIA TABULARIS – ALL THAT GLITTERS IS NOT GOLD

२३ डिसेंबर ला Ursid Meteor Shower

हा उल्कावर्षाव १७-२३ डिसेंबर पर्यंत दिसत असला तरी सर्वाधिक उल्का २३ डिसेंबर ला दिसतील. उर्सा मायनर Ursa Miner तारा समूहात हा उल्कावर्षाव रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत पूर्व-उत्तर दिशेला दिसेल परंतु जास्तीत जास्त ताशी २० उल्का दिसण्याची शक्यता आहे. हा उल्कावर्षाव 8P/Tuttle ह्या धूमकेतू मुळे दिसतो. अवकाशातील दगड जेव्हा पृथ्वी च्या वातावरणात प्रवेश करतात तेव्हा घर्षणाने ते तापतात आणि एका रेषेत चकाकताना दिसतात, त्यांना आपण तारा तुटणे असे संबोधित करतो. यातील बहुतेक दगड राख होऊन जमीवर पडतात किंवा कधी उल्का रूपाने जमिनीवर आदळतात.

२५-२८ डिसेंबर ला धूमकेतू पाहण्याची संधी

संपूर्ण डिसेंबर महिन्यात 62P/Tsuchinshan हा धुमकेतू पूर्वेला पहाटेच्या आकाशात लिओ Leo तारा समूहात दिसणार आहे, परंतु हा धुमकेतू २५ डिसेंबर ला पृथ्वी च्या सर्वाधिक जवळ (१.२७ अस्ट्रोनॉमिकल युनीट) अंतरावर असणार आहे आणि २८ डिसेंबर ला सर्वाधिक तेजस्वी दिसणार आहे. याची तीव्रता ८ असेल. रात्री २ नंतर पहाटे  सुर्योदयापर्यंत पर्यंत हा धुमकेतू द्विनेत्रीं आणि दुर्बिणीने पाहता येईल. साध्या डोळ्याने दिसणार नाही.

हेही वाचा: ADOPT A NEST, SAVE GREAT HORNBILL

ग्रह आणि चंद्राची युती

  • १४ डिसेंबर ला चंद्र-बुध ग्रहाची युती
  • १८ तारखेला  चंद्र-शनी ची युती
  • १९ ला चंद्र-नेपचून युती (आस्ट्रेलिया येथून पिधान)
  • २२ ला चंद्र-गुरू ग्रहाची युती दिसेल.

आकाशातील ग्रह दर्शन

  • संध्याकाळी सुर्यास्ता नंतर बुध ग्रह दिसेल
  • रात्री गुरू आणि शनी ग्रह दिसेल
  • रात्री गुरू आणि शनी ग्रह दिसेल
  • पहाटे मंगळ आणि शुक्र ग्रह दिसेल.

Winter Solstice

२२ डिसेंबर हा विंटर सोलेस्टिस म्हणून मानल्या जातो हा दिवस  वर्षातील सर्वात लहान दिवस आणि  मोठी रात्र असते. या वर्षी हा योग रात्री ८.५४ वाजता असेल.

वरील सर्व खगोलीय घटना नागरिक,अभ्यासक आणि निरीक्षकांनी अवश्य पहाव्यात असे आवाहान स्काय वॉच गृप, इंडिया या खगोल संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे

प्रा. सुरेश चोपणे, चंद्रपुर
अध्यक्ष – स्काय वॉच गृप
९८२२३६४४७३

Image Credit: NBC News

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment