महाधनेशचे घरटे दत्तक घ्या Adopt a Nest, Save Great Hornbill
महाधनेशचे घरटे दत्तक घ्या Adopt a Nest, Save Great Hornbill

महाधनेश म्हणजेच Great Hornbill सह्याद्रीच्या जंगलात आढळणारा कोकणाशी नाळ जोडला गेलेला, देवराया, जंगलं आणि क्वचित मानवी वस्तीजवळ आढळणारा देखणा पक्षी. त्यांच्या पंखांचा होणारा मोठा आवाज आणि दूरवरून ऐकू येणारी यांची साद यामुळे सर्वांच्याच परिचयाचा. भेळा, शेवर, आंबा, सातविण अशा झाडांच्या ढोल्या निवडून त्यात आपल्या पिल्लांना हे पक्षी वाढवत असतात.

फलाहारी असल्यामुळे वड, पिंपळ, उंबर, भेरलीमाड, घुरवड, काजरा, चांदफळ अशा देववृक्ष आणि रायांमधील पुराण वृक्षांची फळे खाऊन हे पक्षी आपली गुजराण करतात. या देववृक्षांच्या बिया सर्वदूर पोहोचवून वृक्ष निर्मिती आणि वृक्षप्रसाराचे महानकार्य अखंडपणे करत राहणारा हा पक्षी आता मात्र संकटात सापडला आहे.

हेही वाचा : बर्ड मॅन ऑफ ऑफ इंडिया

खाजगी जमिनीतील वृक्षतोड, बागायती लागवड, जंगलांचा होणारा विनाश आणि दिवसागणिक संकुचणाऱ्या देवराया यामुळे जुने वृक्ष केव्हाच करवतींच्या हवाली झाले आहेत. नवीन वृक्षारोपण होत असले तरी त्यांचे मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर होण्यासाठी अनेक वर्ष बाकी आहेत. इतकी वर्ष धनेश पक्षी मात्र संकटाचा सामना करू शकतील का? हा खरा प्रश्न आहे.

यामुळेच सद्यस्थितीतील पुराण वृक्ष, ढोल्या असणारी झाडे वाचवणे ही तातडीची गरज बनली आहे. यासाठीच जनजागृती आणि लोकसहभाग आवश्यक आहे. सह्याद्री संकल्प सोसायटी (Reg No. F77475) धनेश पक्षाचा अधिवास आणि ढोल्या असणारे वृक्ष वाचवण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून धनेश पक्ष्याची दहा ढोल्या असणारी झाडे संरक्षित करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी भरीव निधीची आवश्यकता भासणार आहे. असे वृक्ष दत्तक घेऊन या अभियानात सहभागी होण्याचे सह्याद्री संकल्प सोसायटी तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

मोहिमेत सहभागी होण्यासाठी पुढील लिंक देण्यात आली आहे

milaap.org/fundraisers/support-sahyadri-sankalp-society

अधिक माहितीसाठी संपर्क:

प्रतिक मोरे 7798233243 किंवा sahyadrisankalp@gmail.com

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment