Zero Shadow Day सावली गायब झाली ??
सावली गायब झाली ?? Zero Shadow Day …

एखाद्या व्यक्तीबद्दल विश्वास व्यक्तकरताना ती सावलीसारखी माझ्याबरोबर असते, असं वाक्य गप्पांमध्ये नेहमी ऐकायला मिळतं. कोणीही तुमची साथ सोडली तरी सावली कधीच तुम्हाला सोडत नाही, असे सांगितले जाते. पण वर्षात असे दोन दिवस असतात, ज्या वेळी काही क्षणासाठी सावली गायब होते, म्हणजेच ती तुमच्याखालीच लपून बसते. फक्त माणसाचीच नव्हे तर, सगळ्याच वस्तू, झाडे, गाड्या, घरे सगळ्यांची सावली या वेळेत गायब होते. या घटनेला झीरो शॅडो डे Zero Shadow Day असे म्हणतात.

शून्यसावली दिवस अर्थात झीरो शॅडो डे ही भौगोलिक घटना आहे. वर्षातून दोन दिवस असे असतात, त्या वेळी आपल्याला आपली सावलीच दिसत नाही. पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्‍यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्‍यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्‍यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव आहे.

कांदळवन आणि सागरी जैवविविधता या विषयात परदेशात शिक्षण घेण्यासाठी राज्य शासनातर्फे शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये वेगवेगळ्या दिवशी झीरो शॅडो डे अनुभवता येणार आहे. ती ठिकाणे खालील प्रमाणे

 • १० मे – सातारा, अक्कलकोट.
 • ११ मे – वाई, महाबळेश्‍वर.
 • १२ मे – बार्शी, बारामती.
 • १३ मे – लातूर.
 • १४ मे – अलिबाग, दौंड, पुणे.
 • १५ मे – मुंबई.
 • १६ मे – नगर, कल्याण, नांदेड, ठाणे.
 • १८ मे – पैठण.
 • १९ मे – जालना.
 • २० मे – औरंगाबाद, नाशिक.
 • २१ मे – मनमाड.
 • २२ मे – यवतमाळ.
 • २३ मे – बुलडाणा, मालेगाव.
 • २४ मे – अकोला.
 • २५ मे – अमरावती.
 • २६ मे – भुसावळ, जळगाव, नागपूर.

आपापल्या शहरात शून्य सावली चा अनुभव जरूर घ्या..

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment