Mangrove आणि Marine Biodiversity या विषयात परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती
कांदळवन आणि सागरी जैवविविधता या विषयात परदेशात शिक्षण घेण्यासाठी राज्य शासनातर्फे शिष्यवृत्ती

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सागरी जैवविविधता या विषयात रुची असणाऱ्या अथवा अभ्यास करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगला निर्णय घेण्यात आला आहे

या निर्णयात कांदळवन Mangrove आणि सागरी जैवविविधता Marine Biodiversity या विषयात परदेशात शिक्षण घेण्यासाठी राज्य शासनाने शिष्यवृत्ती Scholarship जाहीर केली आहे. दर वर्षी २५ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल असा महत्वाचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

वन विभागाच्या कांदळवन सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शिष्यवृती देण्यात येणार असून टाईम्स हायर एज्युकेशन रँकिंग (THE च्या २०० च्या आतील किंवा QS – Qacquuarelli Symonds रँकिंग १५० च्या आतील) परदेशी शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल. यापैकी तीस टक्के जागांवर मुलींची निवड करण्यात येईल. मरिन सायन्स, मरिन इकॉलॉजी, ओशोनोग्राफी, मरिन बायोलॉजी, मरिन फिशरीज, मरिन बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोडायर्व्हिसीटी या अभ्यासक्रमांसाठी १५ पदव्यूतर पदवी आणि १० पीएचडी अशा दरवर्षी २५ शिष्यवृत्ती दिल्या जातील. पदव्यूत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे वय कमाल ३५ वर्षे आणि पीएचडीसाठी कमाल वय ४० वर्षे असावे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. या योजनेसाठी ३१ कोटी ५० लाख रुपये इतका खर्च येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.

कांदळवनाबद्दल काही मुद्दे थोडक्यात: 

नैसर्गिक तटरक्षक – सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तीपासून जर किनयऱ्यांचा बचाव करायचा असेल तर ही निसर्ग निर्मित वने हाच एकमेक आणि उत्तम पर्याय आहे. वाढत्या शहरीकरणामुळे गेल्या काही वर्षांत अश्या बऱ्याच वनांवर कुऱ्हाड फिरली, आणि हे नैसर्गिक अधिवास कमी होऊन मानव निर्मित ‘रहिवास’ निर्माण केले गेले. आता अश्या किनारी प्रदेशात हे निसर्गदत्त तटरक्षक नाहीसे झाल्यामुळे सुनामी आणि वादळांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा मोठा धोका आहे.

हेही वाचा: पक्ष्यांनाही लागते तहान

कार्बन संकलन – वनसंपत्तीच्या महत्वाच्या कार्यापैकी एक म्हणजे वातावरणातील कार्बन शोषून घेऊन ऑक्सिजन चा पुरवठा करणे. या प्रक्रियेत आपली कांदळवने एकदम तरबेज ! संशोधना अंती हे सिद्ध झाले आहे की कांदळवनांची कार्बन शोषून घेण्याची व संकलित करण्याची क्षमता ही वर्षावनांपेक्षा कैक पटींनी अधिक आहे !

मातीची धूप रोखणे – कांदळवने आपल्या अनोख्या आणि गुंतागुंतीच्या मूळ प्रणाली मुळे मातीची धूप रोखतात.

सागरी जीवांचे तसेच पक्ष्यांचे नंदनवन – या वनांमध्ये आपल्याला अनेक विविध सागरी जीव पाहायला मिळतात. जसे की, विविध प्रजातींचे खेकडे, मासे, मड स्कीपर्स, साप, पाली इत्यादी. तसेच ही वने दाट असल्यामुळे इथे अनेक पक्षी देखील पाहायला मिळतात. विविध प्रकारचे बगळे, घारी, गरुड, घुबड, विविध किंगफिशर्स  आणि अनेक लहान पक्षी.

जगभरात या कांदळवनाच्या साठ प्रजाती आढळतात. महाराष्ट्रात या पैकी वीस प्रजाती दिसतात. राज्याच्या सागरी किनारपट्टीवर या प्रजाती बघायला मिळतात. पांढरी चिप्पी ही प्रजाती किनारपट्टीवर सगळीकडे आढळते. पांढरी चिप्पीचे वैशिष्ट्य म्हणजे ती जमीन किंवा वाळू घट्ट धरून ठेऊ शकते. या प्रजातीच्या मुळांमध्ये पाण्यातील प्रदूषण कमी करण्याचे कौशल्य असते. पांढऱ्या चिप्पीच्या फुलांवर मधमाशा आकर्षित होतात आणि तिथेच पोळे करतात. पांढरीचिप्पीमध्ये औषधी गुणधर्मही आहेत

पांढरी चिप्पी (Sonneratia alba) या वृक्षाला राज्य कांदळवन वृक्ष म्हणून जाहीर केले आहे

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment