Michaung Cyclone... मिगजौम चक्रीवादळ...
मिगजौम चक्रीवादळ… Michaung Cyclone…

वातावरणातील घडामोडींमुळे बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून रविवारी त्याचे मिगजौम चक्रीवादळात Michaung Cyclone रूपांतर झाले हे वादळ ५ डिसेंबरला दुपारी नेल्लोर व मछली पट्टम दरम्यान म्हणजेच आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी ओलांडणार आहे साधारणतः ८० ते ९० किलोमीटर प्रतितास वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग चक्रीवादळामुळे शंभर किलोमीटर होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे

या वादळाला म्यानमार ने नाव दिले आहे त्याचा अर्थ लवचिकता किंवा एखाद्या संकटाला सामर्थ्याने सामोरे जाणे असा होतो गेल्या वर्षभरात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे चौथे तर हिंदी महासागरातील हे सहावे वादळ आहे

वादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आय एम डी आणि स्थानिक प्रशासनाने या भागातील गावांना अलर्ट दिला आहे दक्षतेचा इशारा दिला आहे या काळात समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे मासेमारीसाठी समुद्रात असलेल्या पश्चिम आरांना परतण्याचे मच्छीमारांना परतण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत दरम्यान वादळामुळे ओडिसा आणि लगतच्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

हेही वाचा: ADOPT A NEST, SAVE GREAT HORNBILL

वादळांची नावं ठरतात तरी कशी

वादळांना पूर्वी गावांची नावं दिली जात होती. ज्या गावात वादळ धडकणार, त्याच नावाने वादळ ओळखलं जात असे. आता जागतिक हवामान संघटनेकडून (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड द पॅसिफिक (UNESCAP) च्या सदस्य देशांकडून वादळांच्या नावांची यादी केली जाते.

अंटार्टिक समुद्रात येणाऱ्या वादळांना नॅशनल हरिकेन सेंटर नाव देते. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या वादळांना रिजनल स्पेशलाइज्ड मेटिअरोलॉजिकल सेंटरतर्फे नावे दिली जातात. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंक  आणि थायलंड या देशांकडून भविष्यात येणाऱ्या वादळांची नावं आधीच सुचवली जातात. याची यादी करुन क्रमवारीने प्रत्येक वादळाला एकेक नाव दिलं जातं. त्यानुसार बांग्लादेशाने काही वर्षांपूर्वी सुचवलेले बिपरजॉय Biperjoy हे नाव क्रमवारीनुसार या वादळाला देण्यात आले आहे.

हेही वाचा: MAHARASHTRA PAKSHIMITRA AWARD ANNOUNCED

समुद्राच्या तापमानामुळे घडणाऱ्या विविध घटनांपैकी एक म्हणजे वादळ. ज्या वेळी समुद्रातील एका मध्य बिंदू भोवती म्हणजेच कमी दाबाच्या प्रदेशाजवळ चोहोबाजूंनी वारे वाहायला लागतात. त्यातून वादळ तयार होते. या वादळाची तीव्रता अधिक वाढल्यानंतर त्याला चक्रीवादळ म्हणतात. वादळांतील वाऱ्यांचा वेग किती आहे, त्यानुसार हे वादळ किती भयंकर आहे हे जाहीर केले जाते.

भाषेनुसार वादळांची नावे वेगवेगळी

जगभरात चक्रीवादळांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. वेगवेगळ्या भाषेत वादळांची ओळख स्वतंत्र आहे. उत्तर गोलार्धातील प्रदेशात म्हणजेच अटलांटिक समुद्र, कॅरेबियन समुद्र आणि पूर्व  पॅसिफिक समुद्रामध्ये येणाऱ्या वादळांना हरिकेन म्हणतात. पॅसिफक समुद्राच्या पश्चिम भाग आणि चीनच्या समुद्रात येणाऱ्या वादळांना टायफून म्हणतात. ऑस्ट्रेलियामध्ये चक्रीवादळांना विली विलीस असे नाव आहे.  हिंदी महासागरामध्ये ज्या वादळांची निर्मिती होते,  त्यांना  सायक्लोन मराठीत चक्रीवादळ म्हणतात.

तुम्हाला पाठवायचंय का नाव ?

भारत सरकारतर्फे नागरिकांनी सुचवलेलं नाव देखील निवडले जाते. त्यामुळे भविष्यात येणाऱया वादळाचं तुम्हीही नाव सुचवू शकता. त्यासाठी काही नियम आहे. मुख्य म्हणजे ते छोट, नेमक आणि गांभीर्याने सुचवलेले हवे. त्यातून कोणते वाद होणार नाहीत ना याची अभ्यासक काळजी घेतात. पूर्वी वापरलेलं नाव परत वापलं जात नाही. हटके नाव सुचवलं आणि त्या शब्दातून चांगला बोध होत असले तर ते पटकन आवडतं. वादळाचं नाव पाठविण्यासाठी डायरेक्टर जनरल ऑफ मेटरॉलॉजी, इंडिया मेटरॉलॉजिकल डिपार्टमेंट, मौसम विभाग, लोधी रोड, नवी दिल्ली ११०००३ हा पत्ता आहे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment