महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रीत
महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रीत Maharashtra Pakshimitra Sammelan Sangli

या वर्षीचे ३६ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन Maharashtra Pakshimitra Sammelan सांगली येथील बर्ड साँग या संस्थेच्या यजमानपदाखाली, नवभारत शिक्षण मंडळाचे शांतिनिकेतन लोक विद्यापीठ संकुल, सांगली येथे २३ आणि २४ डिसेंबर २०२३ दरम्यान होत आहे. 

पक्षी संवर्धन, जनजागृती या क्षेत्रात सातत्याने केलेल्या कामाबद्दल तसेच पक्षी विषयक संशोधन, संवर्धन, जनजागृती, पक्षी उपचार, सेवा व सश्रुषुा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती/ संस्थांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने २०१९ पासून महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे पुरस्कार  देण्यात येतात. त्यानुसार २०२३ या वर्षासाठी खालील चार पुरस्कारांसाठी प्रस्ताव  मागविण्यात येत आहेत.

  • महाराष्ट्र पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार
  • महाराष्ट्र पक्षिमित्र संशोधन पुरस्कार
  • महाराष्ट्र पक्षिमित्र संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार
  • महाराष्ट्र पक्षिमित्र जनजागृती पुरस्कार

जीवन गौरव पुरस्कार हा जेष्ठ व्यक्तीस आणि इतर तीन पुरस्कार हे व्यक्ती किंवा संस्थांना देण्यात येतील. पुरस्कारचे स्वरूप अनुक्रमे रु. ५०००/-,  रु. २५००/-,  रु. २५००/- व रु. २५००/-  रोख रक्कम, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे राहील.

स्व. रमेश लाडखेडकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ महाराष्ट्र पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार – २०२३ देण्यात येणार आहे. दीर्घकाळ पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी संवर्धन, अधिवास संवर्धन, पक्षीविषयक जनजागृती यासाठी कार्य केलेल्या व वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ व्यक्तीच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येईल.

हेही वाचा: यंदाचे पक्षिमित्र संमेलन सांगली मध्ये

महाराष्ट्र पक्षिमित्र संशोधन पुरस्कार: स्व. डॉ. जी. एन. वानखेडे स्मृती प्रीत्यर्थ महाराष्ट्र पक्षिमित्र संशोधन पुरस्कार देण्यात येईल. हा पुरस्कार पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास, संशोधन, आणि त्यातून संवर्धन असे कार्य करणाऱ्या या क्षेत्रातील कार्यरत व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येईल. पीएचडीचे संशोधन, प्रकल्पातील कार्य, संशोधन निबंध, प्रकाशित साहित्य, पेपर, रिपोर्ट, पक्षी नोंदणी अहवाल ई. चा विचार करण्यात येईल.

श्री. अनिल बहादुरे यांचे तर्फे प्रायोजित महाराष्ट्र पक्षिमित्र संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार. हा पुरस्कार पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी संवर्धन, अधिवास संवर्धन, जखमी पक्षी उपचार व सुश्रुषा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येईल.

महाराष्ट्र पक्षिमित्र जनजागृती पुरस्कार – रामभाऊ शिरोडे (वाणी) स्मृती. हा पुरस्कार पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास, आणि त्यातून जनजागृती आणि संवर्धन असे कार्य करणाऱ्या या क्षेत्रातील कार्यरत व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येईल.

दरवर्षी प्रत्येकी एक पुरस्कार देण्यात येईल आणि  गरज पडल्यास पुरस्कार विभागून देण्यात येतील (जीवन गौरव सोडून). चारही पुरस्कार त्या पुढील संमेलनात प्रदान करण्यात येतील. पुरस्कारासाठी निवड करतांना संस्था करिता म. प. संलग्नित संस्थेचा तसेच व्यक्ती साठी महाराष्ट्र पक्षिमित्रचे सभासद, पक्षिमित्र संमेलनामधील सहभाग, पक्षिमित्र चळवळीतील सहभाग ई. चा प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येईल.

हेही वाचा: बर्ड मॅन ऑफ ऑफ इंडिया

वरील पुरस्कारांसाठी स्वतः किंवा इतर व्यक्ती किंवा संस्था मार्फत प्रस्ताव सादर करता येतील. एखाद्या गटात योग्य प्रस्ताव प्राप्त न झाल्यास पुरस्कार जाहीर करण्यात येणार नाही. महाराष्ट्र पक्षिमित्र कार्यकारिणीतील सदस्य किंवा त्यांचे कुटुंबीय या पुरस्कारासाठी अर्ज करू शकणार नाहीत, किंवा त्यांना पुरस्कार देण्यात येणार नाही.

पुरस्कारासाठी प्रस्ताव दि. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्र पक्षिमित्रच्या पत्त्यावर, कार्यवाह, महाराष्ट्र पक्षिमित्र, व्दारा प्रा.डॉ. गजानन वाघ, ६३, अरण्यार्पण, समता कॉलनी, कठोरा रोड, व्हीएमव्ही पोस्ट, अमरावती – ४४४ ६०४ किंवा Scan केलेला संपूर्ण प्रस्ताव PDF स्वरुपात संस्थेचा इमेल- pakshimitra@gmail.com वर सुद्धा पाठविता येईल. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्या दरम्यान पुरस्कारार्थी यांची नावे जाहीर करण्यात येतील. अर्जाचा नमुना व पुरस्कारांची सविस्तर माहिती संस्थेची वेबसाईट www.pakshimitra.org येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहित महाराष्ट्र पक्षिमित्रचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली आहे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment