Maharashtra Pakshimitra Sammelan
यंदाचे पक्षिमित्र संमेलन सांगली मध्ये Maharashtra Pakshimitra Sammelan Sangli

पक्षिमित्रांचे संघटन असलेली महाराष्ट्र पक्षिमित्र ही संस्था राज्यात गेली चार दशके कार्यरत असून, पक्षी अभ्यास, संवर्धन व जनजागृती यासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेची राज्यस्तरीय तसेच विभागीय स्तरावर पक्षिमित्र संमेलने होत असतात. अशा प्रकारचे संघटन आणि संमेलने घडवून आणणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.

या वर्षीचे ३६ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सांगली येथील बर्ड साँग या संस्थेच्या यजमानपदाखाली, नवभारत शिक्षण मंडळाचे शांतिनिकेतन लोक विद्यापीठ संकुल, सांगली येथे २३ आणि २४ डिसेंबर २०२३ दरम्यान होत आहे. या संमेलनाच्या एक दिवस आधी दिनांक २२ डिसेंबर रोजी “पक्ष्यांचे आवाज” या विषयावरील पहिली राष्ट्रीय स्तरावरील परिषद सुद्धा आयोजित केली जाणार आहे.

या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून जेष्ठ वन्यजीव अभ्यासक श्री. अजित उर्फ पापा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पापा पाटील यांनी मानद वन्यजीव रक्षक सांगली म्हणून काम केले असून, राज्याच्या वन्यजीव मंडळावर सुद्धा सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.ते गेली अनेक वर्षे वन्यजीव शिकार व तस्करी, जंगल तोड, खाण उद्योगाचे अतिक्रमण या सारख्या संवेदनशील विषयावर काम करीत आहेत. ते सर्प अभ्यासक असुन व त्यांनी सापांचे संवर्धनासाठी सुद्धा विशेष कार्य केलेले आहे. ते महाराष्ट्र पक्षिमित्रचे जेष्ठ सभासद असून अनेक संमेलनात त्यांचा सहभाग राहिलेला आहे.

महाराष्ट्र पक्षिमित्र राज्य कार्यकारिणी तर्फे श्री. अजित उर्फ पापा पाटील यांची एकमताने निवड करण्यात आल्याची महिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली आहे.

हेही वाचा : बर्ड मॅन ऑफ ऑफ इंडिया

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

4 Comments

 • Jayant Atrey
  Posted September 1, 2023 10:24 am 0Likes

  Dates for prakshi mitr sammelan are final ??? How to register ? Abd fee ?

  • Nisarga Ranga
   Posted September 8, 2023 1:19 pm 0Likes

   we will keep you posted on the developments. Thank you.

 • Prof.(Dr.) Prakash P. Bakre
  Posted November 7, 2023 7:51 am 0Likes

  I am a student of zoolgy/ environmental science. Serves as HOD, zoology Deptt. And Director of IGC for Env. Sci. Of Rajasthan Univ. Jaipur. Was member of Wildlife Board of Rajastha for 17 years. I am a Sr. Fulbright Fellow and worked at The Institute of wildlife and Environmental Toxicology. Developed non-invasive methodology using avian feaces as bio-indicator of environmental pollution. I was chairman of SEAC of Rajasthan and served as member of SEAC Maharashtra. I am back in Maharashtra and if permitted would like to join 36th session of Pakshimitra at Sangli.

  • Nisarga Ranga
   Posted 4 days ago 1:28 pm 0Likes

   hi

   request you to connect with Dr Jayant Wadatkar of Maharashtra Pakshimitra on 9822875773

   if you are interested, you can publish your articles (if any , in marathi) here on Nisargaranga – Nisargavarta

   you may send it on info@nisargaranga.com

   Thank you.

Leave a comment