झाडांप्रमाणे ऑर्किडचही केलं पुनर्रोपण Nature Conservation Society Orchid
झाडांप्रमाणे ऑर्किडचही केलं पुनर्रोपण

रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये, सरकारच्या वेगवेगळ्या कामांसाठी तोडाव्या लागणाऱ्या बुजुर्ग झाडांचे अलीकडे पुनर्रोपण केले जाते. यासाठी झाडे शास्त्रीय पद्धतीने झाडे मुळांपासून काढून दुसरीकडे लावतात. विशेष म्हणजे या प्रयोगातून अनेक मोठी झाडे नव्या जागेत स्थिरावली आहेत. झाडांच्या बाबती यश मिळतय तर मग आपण Orchid ऑर्किडही वाचवली पाहिजे, अशा विचारातून कोल्हापूरमधील Nature Conservation Society, ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशन आणि वनविभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑर्किड वनस्पतींना वाचवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

उपक्रम राबविण्याचे कारण म्हणजे केंद्र शासनाकडून रत्नागिरी ते नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे. यासाठी रस्ता रुदींकरणाचे काम जोरात सुरू असून या मार्गावर कोल्हापूर ते आंबा घाट परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असलेली शेकडो वर्षे जुनी, काही दुर्मिळ झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. वाईट बाब म्हणजे या झाडांबरोबरच, त्यावर फुलणाऱ्या ऑर्किड वनस्पती ज्यांना आपण स्थानिक भाषेत आमरी किंवा आमर म्हणतो, त्या नष्ट होणार आहेत. ही बाब लक्षात आल्यावर निसर्ग संवर्धनासाठी काम करणारी नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीने ऑर्किडला वाचवायचे ठरवले.

हेही वाचा: सह्याद्रीतल्या अंजनीची भुरळ

जगालीत सर्वात सुंदर, आकर्षक आणि रेखीव फुलांमध्ये आमरीचा समावेश होतो. सह्याद्रीच्या जंगलात सुमारे शंभर पेक्षा जास्त प्रकराची ऑर्किड बघायला मिळतात. रस्त्याचे काम सुरू असलेल्या मार्गाचा संस्थेने पहिल्यांचा सर्वेक्षण केले.

रस्त्यावर  त्यामुळे संस्थेने तीन दुर्मीळ प्रजातींच्या ११०० हून अधिक ऑर्किड्स वनस्पती वाचवून त्यांचे पुनर्रोपण आंबा घाटातील जंगलात केले.

हेही वाचा: पळसाला पानं तीनच.. FLAME OF FOREST

ऑर्किडचे पुनर्रोपण करण्याबाबत संस्थेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कोल्हापूरमधील मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांना निवेदन दिले. त्यांनीही या उपक्रमासाठी सहकार्याची तयारी दाखली. त्यामुळे संस्थेचे कार्यकर्ते नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी, ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशन आणि निसर्गप्रेमी मित्र ग्रुप पेठवडगाव यांनी एकत्र येऊन मार्चच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रविवारी बांबवडे ते आंबा घाट परिसरातील अनेक प्रकारच्या ऑर्किड्स वनस्पती तोडलेल्या व तोडल्या जाणाऱ्या झाडांवरून कष्टाने काढल्या आणइ नियोजनानुसार आंबा घाटातील इतर झाडांवर त्यांचे पुनर्रोपण केले. या मोहिमेमध्ये वनविभागातील कर्मचाऱ्यांसोबत संस्थेचे अध्यक्ष तबरेज खान, माजी वन्यजीव मंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर, कोल्हापूरचे मानद वन्यजीवरक्षक स्वप्निल पवार, धनंजय जाधव, विवेक कुबेर सहभागी झाले होते.

निसर्ग साखळीचे कमीत कमी नुकसान करून विकास झाला पाहिजे. नुकसान टाळण्यासाठी आता तंत्रज्ञानाचीही मदत घेता येऊ शकते.अभ्यासकही चांगले पर्याय देऊ शकतात. जंगलातील सौंदर्य खुलविणाऱया ऑर्किडला वाचविण्याची गरज लक्षात घेऊन आम्ही हा उपक्रम राबवला. दोन रविवारमध्ये आम्ही तीन दुर्मिळ प्रकारातील ११०० ऑर्किड वनस्पतींचे पुनर्रोपण केल्याची माहिती नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीचे अध्यक्ष तबरेज खान यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे.

या मोहिमेच्या चौथ्या टप्प्यात, तोडलेल्या वृक्षांवरून जमा केलेल्या जवळजवळ २००० च्या आसपास ऑर्किड वनस्पतींचे आंबा राखीव वनक्षेत्रातील सुनियोजित ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन या मोहिमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी तर्फे करण्यात आले आहे.

मोहिमेत स्वयंसेवक म्हणून सहभाग नोंदविण्यासाठी अथवा या मोहिमेची अधिक माहिती मिळविण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

धनंजय जाधव.. 9503917111 गुणकली भोसले 7517514646

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment