Wildlife SOS आणि महाराष्ट्र वन विभागातर्फे बिबट्या आणि बछड्याची पुनर्भेट
वाइल्डलाइफ एसओएस आणि महाराष्ट्र वन विभागातर्फे बिबट्या आणि बछड्याची पुनर्भेट

महाराष्ट्र वन विभाग आणि वाइल्डलाइफ एसओएस Wildlife SOS यांच्या संयुक्त प्रयत्नातून पुणे जिल्ह्यातील तेजेवाडी गावाजवळ बिबट्याचा ४५ दिवसांचा बछडा आणि तिच्या आईची यशस्वी पुनर्भेट घडविण्यात आली. उसाच्या शेतात पिकांची काढणी करताना गावकऱ्यांना बछडा सापडला.

या आठवड्याच्या सुरुवातीला तेजेवाडी गावाजवळील उसाच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळले होते. परिसरात अधूनमधून बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांनी तत्काळ या घटनेची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर लगेचच वनाधिकाऱ्यांनी बछड्याची सुटका करून त्याला वाइल्डलाइफ एसओएसद्वारे चालवल्या जाणाऱ्या जुन्नर येथील माणिकडोह बिबट्या रेस्क्यू सेंटरमध्ये आणले.

वाइल्डलाइफ एसओएस पशुवैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य तपासणी केल्यानंतर बछडा मादी असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचे वय अंदाजे ४५ दिवस आहे.

हेही वाचा: सर्व अडचणींवर मात करत जखमी शिक्रा पक्ष्याची पुन्हा गगनभरारी

हेही वाचा: SARISKA व्याघ्र प्रकल्पात येणार अस्वल SLOTH BEAR

ही पुनर्भेट यशस्वी करण्याची मोहीम रात्री उशिरा सुरु करण्यात आली. ज्या ठिकाणी बिबट्याचा बछडा सापडला होता त्याच ठिकाणी वाइल्डलाइफ एसओएस टीम परतली आणि बछड्याला सुरक्षित बॉक्समध्ये ठेवले. बछड्यावर लक्ष ठेवण्यासाठी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये आईने आपल्या बछड्याला सुरक्षितस्थळी नेल्याचा आनंदाचा क्षण कैद झाला.

वाइल्डलाइफ एसओएसचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सावने म्हणाले, बिबट्या हे प्रामुख्याने निशाचर प्राणी असल्याने ते रात्रीच्या वेळी सर्वाधिक सक्रिय असतात. म्हणूनच या काळात पुनर्भेटीचे नियोजन केले जाते. प्राथमिक वैद्यकीय तपासणी आणि प्रोटोकॉलचे पालन करून आम्ही बछड्याला सोडण्यापूर्वी मायक्रोचिपचे  काळजीपूर्वक रोपण केले. या पद्धतीमुळे जंगलातील बिबटे ओळखणे सोपे जाते आणि आम्हाला त्यांची व्याप्ती आणि क्षेत्राचा अभ्यास करता येतो.

वाइल्डलाइफ एसओएसचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक सत्यनारायण म्हणाले, “ग्रामस्थ, शेतकरी आणि वन विभाग आपापली भूमिका यथायोग्य बजावतात म्हणून पुनर्भेट यशस्वी होते”.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment