देशभर साजरा होणार बिग बटरफ्लाय मंथ Big Butterfly Month
देशभर साजरा होणार बिग बटरफ्लाय मंथ Big Butterfly Month

मागील गेल्या दोन महिन्यांमध्ये व्याघ्र दिन, हत्ती दिन. सिंह दिन , देखील साजरा झाला.. याच धर्तीवर येत्या १५ ते २० सप्टेंबर दरम्यान भारतामध्ये बिग बटरफ्लाय मंथ Big Butterfly Month हा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. फुलपाखरांना वाचविण्यासाठी देशातील पंधरा मोठ्या संस्था, फुलपाखरू अभ्यासक यासाठी एकत्र येणार आहेत. या महोत्सवामध्ये फुलपाखरांची माहिती देणाऱ्या कार्यशाळा, फोटोग्राफी स्पर्धा, प्रश्नमंजूषा, परिसंवाद असे भरपूर कार्यक्रम होणार आहेत.

एवढंच नव्हे तर देशभरात सापडणाऱ्या विविध प्रकारच्या फुलपाखरांची महागणनाही या काळात करण्यात येणार आहे. यामध्ये सगळ्यांना सहभागी होता येणार आहे. तुम्ही टिपलेली फुलपाखरांची छायाचित्रे आणि फोटोची थोडीशी माहिती Bangalore Butterflies · iNaturalist या वेबसाइटवर पाठवायची आहे. लोकांकडून येणाऱ्या फोटोंवरून संशोधक फुलपाखरं आणि त्यांच्या वसतिस्थानांची माहिती संकलित करणार आहेत.

जैवविविधतेमध्ये फुलपाखरांना विशेष महत्त्व आहे. परागीभवनामध्ये फुलपाखरे मोठी भूमिका बजावतात. गेल्या काही वर्षांत त्यांची वसतिस्थाने नष्ट होत असल्याने फुलपाखरांच्या अनेक जाती धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे या फुलपाखरांना वाचविण्याची गरज आहे. फुलपाखरांचे आकर्षण असलेल्या देशभरातील निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन फुलपाखरांच्या माहितीचा संग्रह करावा, त्यातून फुलपाखरांच्या संवर्धनाला मदत व्हावी, म्हणून हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

 

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

Leave a comment