मागील गेल्या दोन महिन्यांमध्ये व्याघ्र दिन, हत्ती दिन. सिंह दिन , देखील साजरा झाला.. याच धर्तीवर येत्या १५ ते २० सप्टेंबर दरम्यान भारतामध्ये बिग बटरफ्लाय मंथ Big Butterfly Month हा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. फुलपाखरांना वाचविण्यासाठी देशातील पंधरा मोठ्या संस्था, फुलपाखरू अभ्यासक यासाठी एकत्र…
आंबा हा आपला राज्य वृक्ष, हरियाल हा राज्य पक्षी आणि शेकरू हा राज्य प्राणी होय. काही वर्षांपूर्वी निलवंत (ब्लू मॉरमॉन) या फुलपाखराला राज्याचे फुलपाखरू म्हणून जाहीर करण्यात आले होते. तसेच, काही दिवसांपूर्वी आपल्या राज्याच्या वनमंत्र्यांनी पांढरी चिप्पी (सोनोरेशिया अल्बा – Sonneratia alba) या वृक्षाला राज्य…
पावसाळा सुरू होताच वर्तमानपत्रांमध्ये जसे खळाळणाऱ्या धबधब्यांचे फोटो प्रसिद्ध होतात, तसेच फोटो भातलावणीच्या खाचरांचेही प्रसिद्ध होतात. जून ऑगस्टपर्यंत सतत कुठे ना कुठे ते भातलावणीबद्दल माहिती आपल्या कानावर येते. गंमत म्हणजे काही शाळा अलीकडे मुलांना भातलावणीसाठी Rice Plantation एखाद्या शेतात घेऊन जातात. कोकणात तर भातलावणीच्या स्पर्धाही…
लॉकडाउन सुरू असताना ताडोबाच्या जंगलात या वर्षीही वन विभागाला काळ्या बिबट्याने Black Panther दर्शन दिले. त्या पाठोपाठ मे महिन्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नेत्रावली वन्यजीव अभयारण्यात पाणवठ्याजवळ आलेल्या काळ्या बिबट्याचा फोटो दाखवला. गेल्या महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्याजवळ कोंडिवरे येथे काहींना Black Panther काळ्या…
पावसाळा सुरू झाला की, घराच्या भिंतींवर, काचेवर दिव्याखाली अनेक प्रकारचे किडे येऊन बसतात. तुम्ही कधी पाहिले आहेत का हे किडे? त्यांचे रंग, आकार वेगवेगळे असतात. नसतील बघितले, तर आता आवर्जून बघा. या कीटकांना पतंग Moth असेही म्हणतात. दर वर्षी या पतंगांचा अभ्यास करण्यासाठी जुलैमध्ये राष्ट्रीय…
भारतीतील पश्चिम घाट म्हणजे गुपितांचे आगार आहे. अभ्यासक वर्षानुवर्षे जंगलाने आच्छादलेल्या या डोंगरदऱ्यांमध्ये संशोधन करीत आहेत. त्यामुळे त्यांना कधी नवीन वनस्पती सापडते, तर कधी नवीन फुलपाखरु, पक्षी, साप, खेकडा आणि पालही… असाच एक नवीन शोध म्हणजे महाराष्ट्रातील चार तरुणांना पश्चिम घाटाच्या कुशीत निमास्थित या कुळातील…