कोट्यावधी रुपयांची व्हेल माशाची उलटी ?? Ambergris Ambergrease
कोट्यावधी रुपयांची व्हेल माशाची उलटी ??

“व्हेल माशाची उलटी” हा सध्याचा चर्चेतला विषय आहे. आणि विशेष म्हणजे “उलटी” या गोष्टीची तस्करी होत आहे आणि ती पण खूप मोठ्या प्रमाणात. गेल्या काही महिन्यात या तस्करीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नुकत्याच मालवण मध्ये झालेल्या कारवाईत थोडीथोडकी नाही तर तब्बल १८ कोटी किमतीची व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबरग्रीस Ambergris, Ambergrease जप्त करण्यात आली आहे.       

आता उलटी हा काय वाचनाचा विषय आहे का असं प्रश्न तुम्हाला पडेल, पण ही उलटी सुगंधी आहे आणि खूपच महाग आहे. महाग म्हणजे किती महाग असावी, तर या १ किलो उलटीची किंमत एक ते दिड कोटी रूपये एवढी असते.

समुद्रात जे विविध प्राणी असतात, त्यातला एक आहे Sperm Whale. हा प्राणी जरी माशासारखा दिसत असला तरी हा आपल्या माणसाच्या प्रकारातला म्हणजे mammal प्रकारातला आहे. त्या बद्दल नंतर केंव्हा तरी. तर हा स्पर्मव्हेल आकाराने प्रचंड म्हणजे ५० ते ७० फूट लांब आणि ४० ते ५० टन वजनाचा असतो. याचा आहार ही प्रचंड असतो. समुद्राच्या तळाशी असणारे म्हाकूळ, नळे या सारखे प्राणी हा खातो. या प्राण्यांना एक तिक्ष्ण काटा असतो, हा काटा व्हेल च्या आतड्याला टोचू नये म्हणून व्हेलच्या यक्रुतातून एक चिकट द्रव या काट्यांभोवती लपेटला जातो आणि त्याचा एक मोठा गोळा तयार होतो आणि गोळा व्हेल मासा उलटी करून बाहेर टाकतो आणि याला म्हणतात “अंबरग्रीस”. ही उलटी, म्हणजे अंबरग्रीस सुरूवातीला काळ्या रंगाची असते आणि त्याला घाण वास येतो. समुद्रात अनेक महीने किंवा कधी कधी अनेक वर्षे हा गोळा तरंगत राहतो. समुद्राचे खारे पाणी आणि सूर्य प्रकाश या मुळे याचा रंग अगदी पांढरा होतो आणि हा मग मेणासारखा एक पांढरा गोळा होतो आणि याला एक छानसा सुगंध ही येतो. समुद्रकिनार्यावर हा मासेमारांना कधी कधी सापडतो.

Photo: Ecomare / Wikimedia Commons

तर हे अंबरग्रीस इतके महागडे असण्याचं कारण म्हणजे हे अतिशय दुर्मिळ आहे. तसच याचा उपयोग महागडे perfume बनविण्यासाठी होतो. साधारण perfume चा सुगंध काही तासातच उडून जातो, पण त्यात जर अंबरग्रीस मिसळले असेल तर त्या perfume चा सुगंध बराच काळपर्यंत राहतो कारण ते सुगंधाला stabalize करते. सुगंधी द्रव्य म्हणून तसेच आर्युवेद औषधी मध्ये व युनानी औषधांमध्ये अंबरग्रीस चा उपयोग होतो. फ्रांस तसेच अरब देशांमध्ये अंबरग्रीस ला प्रचंड मागणी आहे.

हेही वाचा: ‘रामसर स्थळ’ म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का ?

युरोप, अमेरिका व इतर पश्‍चिमी देशात या माशाच्या शिकारीवर व अंबरग्रीस विकण्यावर बंदी आली आणि अर्थातच ते आवश्यकच होते. आपल्या भारतातही वन्यजीव संरक्षण कायदा, १९८६ अनुसार स्पर्मव्हेल माशाच्या शिकार व व्यापारा वर बंदी आहे.. तरी पण समुद्र किनार्यावरून विशेषतः गुजरात च्या किनारपट्टीवरून अंबरग्रीस ची तस्करी होते. लांबच लांब पसरलेल्या किनार्यावर अंबरग्रीस शोधण्यासाठी प्रशिक्षित कुत्र्यांचा वापर केला जातो कारण कुत्र्यांना अंबरग्रीस चा सुगंध चट्कन्‌ जाणवतो.

– डॉ. विजय पांडुरंग जोशी, SV AQUAFARM CONSULTANT, RATNAGIRI.

हेही वाचा: सर्पमित्रांचा झाला पद्मश्री पुरस्काराने सन्मान

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment