Environment awareness by cycling from Pune to Tirupati
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पुणे ते तिरुपती सायकल प्रवास

पर्यावरण जागृती तसेच व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याच्या हेतूने व नवीन वर्षाचा संकल्प म्हणून मूळचा भोर तालुक्यातील अभिषेक सूर्यकांत माने या युवकाने पुणे ते आंध्रप्रदेशमधील तिरुपती (बालाजी देवस्थान) हा प्रवास एकट्याने सायकलवर केला. अवघ्या ७ दिवसात अभिषेकने १२०० किलोमीटर हून जास्त अंतर पार केले. पुण्यातील श्री. शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयात अभिषेक सध्या शिक्षण घेत आहे.

Environment Awareness by Abhishek Mane
Abhishek Mane

हेही वाचा: पुण्यातल्या ‘या’ आजी ७० वर्षांपासून विजेशिवाय राहतात

माणसांच्या नव्या जीवनशैलीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून पर्यावरण वाचवण्याबरोबरच उत्तम आरोग्यासाठी सायकल चालवणे फायद्याचे ठरते. प्रवासादरम्यान भेटणार्‍या प्रत्येकाला पर्यावरण आणि आरोग्याचे महत्व पटवून देण्यासाठी सायकलचे फायदे अभिषेक सांगायचा. आधीपासूनच प्रवासाची आवड असल्याने यापूर्वी शिवजयंतीनिमित्त भोर ते कराड असा सायकल प्रवास केला होता. पुणे ते तिरुपति प्रवासादरम्यान फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातील लोकांनी मला खुप प्रेम, आशिर्वाद दिले व मदत देखील केली. हा प्रवास मला खूप काही शिकवण देणारा होता. तसेच भविष्यात फ्रांस मध्ये होणार्‍या जागतिक स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न असल्याचे अभिषेक म्हणाला. 

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

Leave a comment