आज आणि उद्या दिसणार लायरीड उल्कावर्षाव Lyrid Meteor Shower
आज आणि उद्या दिसणार लायरीड उल्कावर्षाव Lyrid Meteor Shower

दरवर्षी २२,२३ एप्रिल दरम्यान चांगला दिसणारा लायरीड उल्कावर्षाव Lyrid Meteor Shower ह्या वर्षीसुद्धा चांगला दिसण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या १५ ते २९ तारखे दरम्यान उत्तर-पूर्व दिशेला लायरा Lyra तारासमूहात दिसणारा हा उल्कावर्षाव २२-२३ एप्रिल रोजी मोठया संख्येने दिसतो अशी माहिती खगोल अभ्यासक व स्काय वॉच गृप चे अध्यक्ष, प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी दिली.

उत्तर-पूर्ण दिशेला सूर्य मावळल्या नंतर लायरा तारा समूहात वेगा Vega ताऱ्याजवळ हा उल्कावर्षाव पाहता येईल. रात्री १०.३० वाजल्यापासून मध्यरात्री पर्यंत हा उल्कावर्षाव दिसू शकेल. ह्या वर्षो ताशी १५ ते २५ उल्का दिसू शकतील असा अंदाज आहे.

हा उल्कावर्षाव थॅचर Thatcher ह्या धूमकेतू मुळे दिसतो. १८६१ मध्ये हा धूमकेतू पृथ्वीजवळुन गेला होता तेंव्हापासून हा उल्कावर्षाव दिसत आहे. पुढे जेव्हा पृथ्वीचा भ्रमणमार्ग जवळून जाईल तेव्हा २० वर्षांनंतर २०४२ मध्ये खुप मोठा उलकावर्षाव दिसणार आहे. हा धूमकेतू पुन्हा २४५ वर्षाने म्हणजे २२७८ साली पृथ्वीजवळून जाणार आहे. तेव्हा उलकांचा जणू पाऊस पडल्या सारखा दिसेल.

ह्या धूमकेतूचा C 1861/G1 शोध अमेरिकेतील अल्फ़्रेंड थॅचर ह्यानी ५ एप्रिल १८६१ मध्ये लावला. परंतु गेल्या २५०० वर्षांपासून प्राचीन लोकांना हा उल्कावर्षाव पाहिला आहे. चिनी लोकांनी इ सन पूर्व ६८७ मध्ये हा उल्कावर्षाव पाहिल्याची नोंद आहे.

निरीक्षण कसे करावे

उल्कावर्षाव दुर्बिणीतून दिसत नाही, लहान (१०-× ५०) आकाराची द्विनेत्री Binoculars असेल तर चांगले. अंधाऱ्या रात्री जमिनीवर लेटून आकाशात पाहिल्यास अतिशय उत्तम पद्धतीने उल्का वर्षाव निरीक्षण करता येते. सर्व खगोल अभ्यासक आणि खगोलप्रेमींनी हा उल्कावर्षाव पहावा. पडता तारा (उल्का) पाहिल्यास आपली कोणतीहि इच्छा पूर्ण होते ही अंधश्रद्धा आहे.

प्रा. सुरेश चोपणे, चंद्रपुर
अध्यक्ष – स्काय वॉच गृप
९८२२३६४४७३

Image Credit: NBC News

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment