Small Indian Civet Cat ची ४५ फूट खोल विहिरीतून सुटका
Small Indian Civet Cat ची ४५ फूट खोल विहिरीतून सुटका

वाइल्डलाइफ एसओएस आणि वन विभागाने मिळून पुणे जिल्ह्यातील नेतवड गावातून एका Small Indian Civet इंडियन सिव्हेटची सुटका केली. या कारवाईत ४५ फूट खोल उघड्या विहिरीतून इंडियन सिव्हेटची सुटका करण्यात आली आणि नंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले.

नेतवाड गावातील स्थानिक शेतकऱ्यांना मंगळवारी जवळच असलेल्या विहिरीतून अनोळखी आवाज येत होता. बारकाईने पाहिले असता सुमारे ४५ फूट खोल विहिरीत एक विचित्र दिसणारा प्राणी अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. स्थानिकांनी तत्काळ महाराष्ट्र वन विभागाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. वाइल्डलाइफ एसओएस माणिकडोह बिबट्या बचाव केंद्राचे बचाव पथकही वनाधिकाऱ्यांच्या मदतीसाठी रवाना करण्यात आले होते.

वाइल्डलाइफ एसओएस च्या रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी पोहोचून या प्राण्याला वाचवण्याची योजना आखली. बारकाईने पाहणी केली असता त्याची ओळख स्मॉल इंडियन सिवेट अशी झाली. विहिरीतून बाहेर पडण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर पाण्यात बुडू नये म्हणून सिवेटने उंच काठावर आश्रय घेतला होता. पथकाने तातडीने कारवाई करत दोरीने बांधलेला पिंजरा विहिरीखाली उतरवून सिवेट ल बाहेर यायचा मार्ग करुन दिला.

हेही वाचा: AI करणार मानव-प्राणी संघर्ष कमी करण्यास मदत

वन्यजीव एसओएसचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सावने म्हणाले, “आम्ही प्राण्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी त्वरित पाहणी केली त्यात आम्हाला सिवेट निरोगी असल्याचे आढळले आणि त्यानंतर आमच्या टीम ने जनावराला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले.”

याबाबत जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले की, आम्हाला स्थानिक शेतकऱ्यांचा फोन आला आणि आम्ही तात्काळ आमच्या कर्मचार् यांना बचावकार्यासाठी रवाना केले. वाइल्डलाइफ एसओएस टीमही उपस्थित होती आणि त्यांच्या मदतीमुळे बचाव कार्य सुरळीत पार पडले. आम्हाला आनंद आहे की सिव्हेटचे नुकसान झाले नाही आणि आम्ही त्याला त्याच्या मूळ अधिवासात सोडण्यास यशस्वी झालो.”

वाइल्डलाइफ एसओएसचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक सत्यनारायण म्हणाले, “सिव्हेट्स बऱ्याचदा अंधश्रद्धा आणि खोट्या समजुतींना बळी पडतात आणि लोक त्यांना एक अपशकुन मानतात. याउलट उंदीरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून सिव्हेट्स परिसंस्थेत अत्यंत अविभाज्य भूमिका बजावतात.”

हेही वाचा: CITY NATURE CHALLENGE एक इंटरेस्टिंग निसर्ग निरीक्षण स्पर्धा या वर्षी भारतात

स्मॉल इंडियन सिवेट (Viverricula indica) हा दक्षिण आणि आग्नेय आशियातील एक लहान सस्तन प्राणी आहे. ही प्रजाती प्रामुख्याने निशाचर व कीटकभक्षी स्वरूपाची असते. इंडियन सिवेट मानवी वस्त्यांमध्ये जसे की शेतीची क्षेत्रे, गावे आणि शहरे आढळू शकतात.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment