महाराष्ट्र वन विभाग आणि वाइल्डलाइफ एसओएस Wildlife SOS यांच्या संयुक्त प्रयत्नातून पुणे जिल्ह्यातील तेजेवाडी गावाजवळ बिबट्याचा ४५ दिवसांचा बछडा आणि तिच्या आईची यशस्वी पुनर्भेट घडविण्यात आली. उसाच्या शेतात पिकांची काढणी करताना गावकऱ्यांना बछडा सापडला. या आठवड्याच्या सुरुवातीला तेजेवाडी गावाजवळील उसाच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळले होते.…
वन्यजीव अभ्यासक, संशोधक आणि पर्यावरणविषयक मार्गदर्शक धर्मराज पाटील यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे नुकतेच धर्मराज पाटील वसुंधरा साक्षरता केंद्र Dharmaraj Patil Earth Literacy Center सुरु करण्यात आले आहे. रानावनातले पक्षी आणि फुलपाखरे हा धर्मराज चा अभ्यासाचा मुख्य विषय होता. आययुसीएन या…
निवृत्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची भारतातील सर्वात प्राचीन व प्रख्यात अश्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी BNHS या संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. ते सध्या या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. BNHS चा गव्हर्निंग कौन्सिलने आता त्यांची अध्यक्षपदी निवड केली आहे.…
वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांच्या समृद्धीसाठी वन महत्त्वाचे आहे. दारिद्र्य निर्मूलन आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात वने महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पर्यावरणीय, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे असूनही वणवा, कीटक, दुष्काळ आणि अभूतपूर्व जंगलतोड यामुळे जंगले धोक्यात आली आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वन दिन…
वन्यजीव आणि वन संरक्षणाशी संबंधित वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये लोकांचा सहभाग वाढावा, या हेतूनं महाराष्ट्र वन विभागातर्फे सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग म्हणून वन विभागाने जंगलप्रेमी, निसर्गप्रेमींसाठी अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. त्याचं काय आहे की, महाराष्ट्र वन विभाग लवकरच स्वतःचे सिग्नेचर साँग…
वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या कमी होते आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून चिमण्यांच्या संवर्धनासाठी २० मार्च हा जागतिक चिमणी दिन World Sparrow Day म्हणून साजरा केला जातो. महंमद दिलावर यांनी २००६ मध्ये नाशिक येथे ‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’ नावाची एक संस्था स्थापन केली. त्यानंतर फ्रान्समधील ‘इकोसिस अॅक्शन…