Big Butterfly Month: १५ ते ३० सेप्टेंबर २०२३ ऑनलाईन प्रश्नमंजुषा
Big Butterfly Month:  ऑनलाईन प्रश्नमंजुषा

सप्टेंबर महिना हा देशभरातील विविध संस्थांतर्फे आता बिग बटरफ्लाय मंथ Big Butterfly Month म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. फुलपाखराला जगातील सर्वाधिक आकर्षक कीटकाचा मान मिळाला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे झाडे, फुले आहेत तिथे फुलपाखरांचे वास्तव्य आहे. निसर्गाने या कीटकाला लक्षवेधक रंग आणि नक्षीदार पंखांची देणगी दिली आहे. काही फुलपाखरे सगळीकडे दिसतात, पण वेगवेगळ्या प्रदेशात दिसणाऱ्या फुलपाखऱांमध्ये असंख्य प्रकार आढळतात. सुंदर कीटक एवढंच त्याचं महत्व नाही, तर परागी भवनाचे सर्वात महत्वाचे काम फुलपाखरे करतात. जिथे फुलपाखरू तेथील जैवविविधता समृद्ध असल्याचे प्रतीक मानले जाते.

अभ्यासकांच्या नोंदींनुसार जगभरात फुलपाखरू आणि पंतगांच्या एक लाखांहून अधिक प्रजाती आढळतात. आपल्या देशामध्ये तेराशे प्रकारची फुलपाखरे राहतात.  देशातील सर्वाधिक फुलपाखरे आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीमध्ये आढळतात. आपल्या महाराष्ट्रात २२५ पेक्षा जास्त प्रकारची फुलपाखरांच्या नोंदी झाल्या आहेत.

हेही वाचा: महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रीत

Big Butterfly Month चे औचित्य साधून जळगाव मधील पक्षीमित्र सौ शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी निसर्गमित्र जळगाव तर्फे  ऑनलाईन ‘फुलपाखरू प्रश्नमंजुषा सप्टेंबर २०२३’ आयोजित केली आहे

प्रश्नमंजुषा ही मराठी व इंग्रजीत सोडवता येणार आहे.  प्रश्नमंजुषा  १५ ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत सोडवता येईल.  ३० सेप्टेंबर ही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शेवटची तारीख असेल. त्यानंतर सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींना प्रमाणपत्र पाठवण्यात येणार नाही. सर्व वयोगटातील पर्यावरण प्रेमी नागरिक बंधू, भगिनींनी आपला थोडासा वेळ काढून या उपक्रमात सहभागी व्हावे व ही प्रश्नमंजुषेची लिंक आपल्या मित्र, मैत्रीणी व स्नेहींना पाठवावी व फुलपाखरु महिना साजरा करण्यात सहभागी व्हावे असे आवाहन पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी केले आहे. सहभागाचे प्रमाणपत्र ईमेलद्वारे पाठविण्यात येईल.  

अधिक माहिती: निसर्गमित्र ,जळगाव

संपर्क क्रमांक- ८९९९८०९४१६ प्रश्नमंजूषा  https://forms.gle/ipAbeLt2V52be1yH9 या Google फॉर्म वर उपलब्ध करण्यात आली आहे

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment