कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांचं बारसं PM Modi asked Suggestions to Rename Cheetahs
कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांचं बारसं – पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ मध्ये मागवल्या होत्या सूचना

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला आलेल्या प्रतिसादाला अनुसरून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलेल्या नामिबियाच्या चित्त्यांचे नव्याने नामकरण करण्यात आले आहे.

ANI नी दिलेल्या वृत्तानुसार  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2022 रोजी मन की बात मध्ये नागरिकांना नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांसाठी नाव सुचविण्यासाठी आवाहन केले होते.

या संदर्भात केंद्र सरकार तर्फे २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत mygov.in या संकेतस्थळावर  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद म्हणून एकूण ११ हजार ५६५ सूचना प्राप्त झाल्या.

निवड समितीने या सूचनांची छाननी करुन आणि त्यातून संवर्धन आणि सांस्कृतिक मूल्यासाठी सुचविलेल्या नावांचे महत्त्व लक्षात घेऊन नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकन चित्त्यांसाठी खालील नावांची निवड केली.

नामिबियाच्या मादी चित्त्याचे जुने नाव अशा होते तिचे आता नव्याने आशा आणि नर चित्त्याचे जुने नाव ओबन होते ज्याचे आता नवीन नाव पवन आहे. दक्षिण आफ्रिकेतील चित्ता ज्याचे जुने नाव फिंडा आणि नवीन नाव दक्ष तर दुसऱ्या चित्त्याचे नाव मापेसू आणि त्याचे नवीन नाव निर्वा आहे. उर्वरित चित्त्यांची नावेही बदलली आहेत.

बिबट्यांचा अभ्यास करणाऱ्या विद्याला तुम्ही ओळखता का ?

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकन चित्त्यांसाठी नवीन नावे सुचवणाऱ्या स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन केले.

चित्त्यांचे सुरक्षित अधिवासात प्रजनन त्यांची संख्या वाढविण्यावर भर देऊन मेटापॉप्युलेशन म्हणून त्यांचे व्यवस्थापन करणे हा या प्रकल्पामागचा मूळ उद्देश आहे

भारतीय जंगलातील शेवटचे चित्ते १९४७ मध्ये नोंदवले गेले होते जेव्हा छत्तीसगड राज्यातील कोरिया जिल्ह्यातील साल जंगलात तीन चित्ते मारले गेले होते. भारतात सन १९५२ मध्ये चित्ते नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment