Sudhir Mungantiwar - RFO यांचा वनाचे रक्षण व संवर्धन करण्‍यात सिंहाचा वाटा
वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा वनाचे रक्षण व संवर्धन करण्‍यात सिंहाचा वाटा – सुधीर मुनगंटीवार

वनपरिक्षेत्र अधिकारी (आर.एफ.ओ.) हा वनखात्‍याचा अतिशय महत्‍वाचा भाग आहे. यांच्‍यामुळेच वनांचे रक्षण व संवर्धन होण्‍यास मदत होते, असे प्रतिपादन महाराष्‍ट्र राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. फॉरेस्‍ट रेंजर्स असोसिएशन, महाराष्‍ट्र द्वारे आयोजित राज्‍यस्‍तरीय अधिवेशनात बोलताना मुनगंटीवार यांनी वरील वक्‍तव्‍य केले. प्रत्‍येक आर.एफ.ओ. कडे वनविभागाची पूर्ण जबाबदारी असते व ती जबाबदारी पूर्ण गांभीर्याने प्रत्‍येक आर.एफ.ओ. पार पाडत असतो याचे मला समाधान आहे, असेही बोलताना पुढे ते म्‍हणाले.

कार्यक्रमाला फॉरेस्‍ट रेंजर असोसिएशनचे महाराष्‍ट्र अध्‍यक्ष कांतेश्‍वर बोलके, अरूण तिखे, असोसिएशनचे सरचिटणीस निलेश गावंडे, नागपूरचे मुख्‍य वनसंरक्षक रंगनाथ नायकडे, संस्‍थेचे संस्‍थापक अध्‍यक्ष विनोद देशमुख, संस्‍थेचे माजी सरचिटणीस किशोर मिश्रीकोटकर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी आर्यनमन विजेता विशाल बोदडे यांचा मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. याप्रसंगी प्रास्‍ताविक करताना असोसिएशनचे सरचिटणीस निलेश गावंडे यांनी आर.एफ.ओ. च्‍या विविध अधिकार व समस्‍यांवर सादरीकरण केले. यामध्‍ये मुख्‍यतः कर्मचारीवर्गांची कमी असल्‍यामुळे काम करण्‍यास अडचणी येतात तसेच वेतनश्रेणीवर सुध्‍दा त्‍यांनी सादरीकरणात सांगीतले.

हेही वाचा: ३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन चंद्रपूरमध्ये, अध्यक्षपदी राजकमल जोब

याप्रसंगी बोलताना मुनगंटीवार पुढे म्‍हणाले की, फॉरेस्‍ट सर्व्‍हे ऑफ इंडिया यांच्‍या एका अहवालानुसार महाराष्‍ट्राचे हरीत क्षेत्र २५५० स्‍वेअर किमीने वाढले आहे. तसेच मॅनग्रोज चे क्षेत्र सुध्‍दा वाढले आहे. वनक्षेत्राशी संबंधित ज्‍या गोष्‍टी चांगल्‍या होत आहेत. त्‍यामध्‍ये तुमचा तसेच वनविभागाच्‍या सर्व कर्मचा-यांचा सिंहाचा वाटा आहे. गेल्‍या काही वर्षात विदर्भात वाघांच्‍या संख्‍येत वाढ झाली आहे. त्‍यांचे संवर्धन व संरक्षण ही जबाबदारी सुध्‍दा तुम्‍ही सर्वजण उत्‍तम पध्‍दतीने करता ही आनंदाची गोष्‍ट आहे. वनविभागाच्‍या संवर्धनामध्‍ये तुमच्‍यासहीत सर्व कर्मचा-यांचा सिंहाचा वाटा आहे व महाराष्‍ट्र वनविभाग देशात नंबर एकवर राहण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करावा असे आवाहन मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केले.

या कार्यक्रमात आपण अनेक विषय आपण मांडलेत. यात ब-याच मागण्‍या सुध्‍दा आहे. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करेन असे आश्वस्त मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केले.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment