मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे विज्ञान रंजन स्पर्धा
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे विज्ञान रंजन स्पर्धा

विज्ञान दिनाच्या निमित्ताने दरवर्षी मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागातर्फे विज्ञान रंजन स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेमध्ये विविध प्रकारचे प्रश्न असतात, ज्या प्रश्नांची उत्तरे कुठेही शोधून, कोणाला विचारून, स्वतः प्रयोग करून मिळवता येतात. अनेक प्रश्न असे असतात की ज्याची उत्तरे गुगलवर मिळत नाहीत. त्या निमित्ताने – शोध घेण्याची, चिकित्सा करण्याची, विश्लेषण करण्याची आणि काही निष्कर्ष काढण्याची संधी सहभागींना मिळते. या स्पर्धेत कोणीही भाग घेऊ शकते, त्यासाठी कोणतीही प्रवेश फी नाही, वयाची अथवा शिक्षणाची अट नाही. एकाच जागी बसून ठराविक वेळेत उत्तरे लिहिण्याचे बंधन देखील नाही.

विज्ञान रंजन स्पर्धेची प्रश्नावली २६ जानेवारीला जाहीर होईल. हाताने लिहिलेल्या उत्तर पत्रिका स्विकारण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२३ आहे. या उत्तर पत्रिकांच्या आधारावर अंतिम प्रयोग फेरीसाठी स्पर्धकांची निवड होईल. या स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ दि २ मार्च २०२३ रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे पार पडेल.

हेही वाचा: निसर्गप्रेमाचे केले करिअरमध्ये रूपांतर

१९९३ पासून चालू असलेल्या विज्ञान रंजन स्पर्धेत दर वर्षी नवे नवे प्रश्न विचारले जात आहेत. आत्तापर्यंत पुढे दिलेल्या वेगवेगळ्या प्रकारांचे प्रश्न विचारले गेले. प्रश्न प्रकार – १) निरीक्षण करून उत्तरे लिहा. २) दिलेले वाक्य चूक की बरोबर हे ओळखा – चुकीचे असेल तर बरोबर करून लिहा. ३) शास्त्रीय कारणे द्या ४) एका शब्दात उत्तर द्या. ५) एका वाक्यात उत्तर लिहा. ६) थोडक्यात उत्तर लिहा ७) सविस्तर उत्तर लिहा ८) एका प्रश्नाची अनेक उत्तरे द्या ९) गणित सोडवा १०) निबंध लिहा ११) प्रयोग करून पहा आणि उत्तरे लिहा १२) कल्पनाशक्ती चालवा १३) वैज्ञानिक वार्तापत्र लिहा १४) चित्र / आकृती काढून उत्तर द्या १५) प्रयोग रचा १६) रचना करा १७) चौथ्या जागी कोण? १८) चित्रावर आधारित उत्तरे द्या १९) पहाणी करून निष्कर्ष काढा. अशा प्रकारचे सुमारे ६० विविध प्रश्न प्रश्नावलीत असतात.

विज्ञान रंजन स्पर्धा २०२३ ची प्रश्नावली तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

आपल्याला काही प्रश्न पडले असतील की ज्यांची उत्तरे वैज्ञानिक असू शकतात, असे प्रश्न कृपया mavipa.pune@gmail.com या ईमेलवर आयोजकांना पाठवावे.

या पूर्वी पार पडलेल्या विज्ञान रंजन स्पर्धेच्या प्रश्नावली www.mavipapunevibhag.blogspot.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

Leave a comment