ऋतूबदलाची चाहूल लागण्यासाठी निसर्गाने काही झाडे, फुले, पक्षी आणि अगदी कीटकांनाही जबाबदारी दिली आहे. हे घटक ठरलेल्या वेळी त्यांची कामे पूर्ण करतात. उदाहरणार्थ पावशा पक्ष्याची शीळ सुरू झाली की पावसाची नांदी, कावळा कोणत्या झाडावर घरटे बांधतोय त्यानुसार यंदाचा पाऊस किती पडतो याचे ठोकताळे ठरवले जातात.…
