ऑलिव्ह रिडले Olive Ridley Turtle या कासवांमधील मादी केवळ अंडी घालण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर येतात. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांची तुरळक घरटी सापडतात. ही कासव रेतीमध्ये खड्डा करून अंडी ठेवतात. त्यांना मातीने झाकून सुरक्षित केल्यावर पुन्हा समुद्राकडे निघून जातात. अंड्यांना पालकांकडून संगोपन किंवा जगण्याचे धडेही मिळत नाहीत.…
नाजूक नक्षीकाम आणि रंगबिरंगी पंखांची फुलपाखरे सगळ्याच वयातील लोकांचे लक्ष वेधतात. लहान मुले चित्र काढायला शिकवल्यावर फुलाचे चित्र काढायला शिकतात, तेव्हा पटकन आपण त्यांना फुलाभोवती घुटमळणारे फुलपाखराचं चित्रही शिकवतो. तर असे हा जगातील सर्वात सुंदर कीटक कोणत्याही बगिचाची शान वाढवतो. त्यामुळेच जगभरात सध्या फुलपाखरू उद्यान…
संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा हे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानले जाते. या अनोख्या सोहळ्याच्या निमित्त शनिवार दिनांक १७ जून २०२३ ला बायोस्फिअर्स संस्था Biospheres Pune, क्षितिज फाऊंडेशन आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने…
जळगाव: करड्या-कंठाची पांगळी Gray-throated Martin (Riparia chinensis) या पक्ष्याची जळगांव जिल्ह्यात प्रथमच नोंद करण्यात आल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली. शेळगांव पाटबंधारा यावल रोड परिसरात पक्षी निरीक्षणासाठी गेले असता गाडगीळ दाम्पत्याला हा पक्षी दिसला. प्रथम दर्शनी त्यांना ती साधी पांगळी (Plain Martin)…
यवतमाळ: वणी तालुक्यातील बोर्डा जवळ विरकुंड गावा नजीक येथील पर्यावरण आणि भूशास्त्र संशोधक प्रा सुरेश चोपणे यांना ६ कोटी वर्षापूर्वीच्या लेट क्रिटाशीयस काळातील विशालकाय डायनोसॉर प्राण्यांचे जीवाष्म Dinosaur Fossils सापडले आहे. दोन वर्षांपूर्वी पायाचे एक अष्मीभूत हाड त्यांना सापडले होते. यवतमाळ जिल्ह्यातील डायनोसॉर जीवाष्म आढळल्याची…
मे महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जूनचा पहिला आठवडा जंगलामध्ये सेलिब्रेशनचा काळ असतो. हजारो काजवे Fireflies जंगलाच्या वेगवेगळ्या भागात रात्री एकाच वेळी रोषणाईचे खेळ खेळतात. तुम्ही सर्वांनी गाण्याच्या तालावर लुकलुकणारे दिवे पाहिले असतील. अगदी त्याचप्रमाणे काजवे लयबद्धरित्या एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाताना लुकलुकताना दिसतात. निसर्गाचा हा…