नदीचे पात्र रुंद असून ते अबाधित ठेवावे व झाडे तोडली जाऊ नयेत
नदीपात्र अबाधित ठेवा, प्रकल्पासाठी वृक्षतोड नको

नदीपात्र अबाधित ठेवा, प्रकल्पासाठी वृक्षतोड नको – डॉ. मेधा कुलकर्णी

पुण्यातील नदी सुधार योजनेच्या ४४ किलोमीटर कामातील एक टप्पा राम-मुळा संगम येथील जागा पाहाणी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वतीने आयोजित केली होती. पुणे महापालिका आयुक्त आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, जीवित नदी संस्थेचे पुणे रिव्हर रिवायवल संस्थेचे शैलजा देशपांडे व अन्य पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्यात केंद्राच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या सहकार्याने नदी सुधार प्रकल्प राबवला जात असून ४४ किलोमीटरच्या एकूण कामासाठी सुमारे ४७०० कोटी रुपये निधी आवश्यक आहे.
या कामाचा एकंदरीत डीपीआर झाला असून यात काही त्रुटी आहेत. शिवाय बंडगार्डन येथील कामादरम्यान नदीत भराव टाकून नदीचे पात्र कमी करण्यात आले आहे दोनसे वर्षांचे जुनी वृक्षांची कत्तल केली जात आहे. याविषयी केंद्रीय मंत्री, सी. आर. पाटील यांच्याकडे डॉ. मेधा कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केली आहे.

या व्यतिरिक्त ज्या स्ट्रेच मध्ये अद्याप काम चालू नाही व सर्वे करून झाडांवर क्रमांक टाकले आहेत. भराव टाकण्याबाबत डीपीआर तयार होत आहेत अशा स्ट्रेचेस मधील कामे त्वरित थांबवावीत. यासाठी जीवित नदी सातत्याने पाठपुरावा करीत आहे.

या अनुषंगाने ही जागा पहाणी आयोजित केली होती. राम नदी, मुळा नदी संगम औंध येथे राम नदीवरील भराव टाकणे, मुळा नदीपात्रात तीनशे ट्रक राडारोडा टाकणे, झाडांवर क्रमांक टाकणे, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत भराव टाकण्याचे कंत्राटद्वारामार्फत चालू असलेली काम अशा बाब उघड झाल्या.

महाराष्ट्रातील वॉटर वारियर्स’ ना प्रजासत्ताक दिनी विशेष अतिथी म्हणून निमंत्रण

“नदीचे पात्र रुंद असून ते अबाधित ठेवावे व झाडे तोडली जाऊ नयेत असा आमचा आग्रह आहे.” असे डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. यासंदर्भात नजीकच्या काळात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे PMC व PCMC च्या आयुक्तांसह व पर्यावरण स्नेही संस्थांना घेऊन बैठक आयोजित करणार असून तोवर चालू काम थांबवण्यात आल्याचे डॉ. मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात PCMC आयुक्त श्री. शेखर सिंग यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली गेले.

“नदीपात्रात भराव टाकल्याने नदीचे पात्र कमी होऊन मानव निर्मिती अडथळे व पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण होऊन अनेक रहिवासी संस्थांमध्ये पाणी शिरते व जीवनमान विस्कळीत होते. नदीला नैसर्गिक सुंदरता आवश्यक असून भराव सारख्या अनैसर्गिक गोष्टींची बाधा, वृक्षतोड, पक्षांच्या अधिवासाचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही” असा इशारा डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिला.

वन विभागाला केली २ एकर जमीन दान

यावेळी पुणे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले, पर्यावरण विभाग प्रमुख संजय शिंदे, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, प्रकल्प विभागचे कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, उपअभियंता मुकुंद शिंदे, महापालिका परिमंडळ दोनचे उपायुक्त अविनाश संकपाळ, प्रकल्प सल्लागार एचपीसी यांचेकडून अर्चना कोठारी, अरबाज, औंध क्षेत्रीय कार्यालय सहा आयुक्त गिरीश दापकेकर, पुढे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, पुणे रिव्हर रिव्हावल समूहाकडुन श्रीमती शैलजा देशपांडे, प्राजक्ता महाजन, मुकुंद मालवणकर व इतर (जीवीतनदी), रुपेश केसेकर, चैतन्य केट, मेघना भंडारी (पुणे संवाद), ऍड. अमेय जगताप, अस्मिता करंदीकर, उमा गाडगीळ, ऍड पी. डी. तारे (बाणेर बालवाडी नागरिक मंच), वेताळ टेकडी बचाव समिती प्राजक्ता पणशीकर, पुष्कर कुलकर्णी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!