Mouse Deer Wildlife Week सर्वात लहान हरिण म्हणजे पिसोरी
चिमुकल हरिण झालय दुर्मिळ Mouse Deer Wildlife Week

चिमुकल हरिण झालय दुर्मिळ Mouse Deer Wildlife Week

लहानपणापासून वेगवेगळ्या जंगल गोष्टींमुळे ओळख झालेला हरिण हा प्राणी सुपरचित आहेत. एखादी व्यक्ती जाणत्या अजाणत्या पणाने वाघ-बिबट्यामध्ये गल्लत करेल. पण हरणाला सगळेच ओळखतात. जंगलातील समृदध जैववैविध्याचे प्रतीक असलेल्या प्राण्यांमध्ये हरणाच्या वेगवेगळ्या भाऊंबंदाचा समावेश होतो. म्हणजे ज्या भागात हरणांची संख्या जास्त तिथे वाघांचा मुक्काम असतो.
हरिण (अँटिलोप) हा एक सस्तन शाकाहारी प्राणी. जगभरात हरणांच्या सुमारे ३१ प्रजाती असून शंभर पेक्षा जास्त जाती आहेत. युरोप, आफ्रिका, आशिया खंडात हरणे वास्तव्यास आहेत. भारतात नीलगाय, काळवीट, चिंकारा, चौशिंगा, तिबेटी हरिण असे वेगवेगळे प्रकार आढळतात. भारतात दिसणाऱ्या या सर्व हरणांमधील सर्वात लहान हरिण म्हणजे पिसोरी. Mouse Deer त्याला पिसूरी हरिण, मूषक हरीण या नावानेही ओळखले जाते.

मुलांच्या भाषेत दिसायला एकदम क्यूट असलेली हे हरिण, जमिनीपासून जेमतेम १ फूट उंचीचे असते. वजनही अवघे दोन ते तीन किलो. या प्राण्याला शिंग नसतात. त्यांची पाठ कमानदार असून मध्ये उंच असते. कस्तुरीमृगाप्रमाणे या प्राण्याचे सुळे मोठे असून ते बाहेर आलेले असतात. त्यांचे पाय गुडघ्यापासून खाली अगदी बारीक व निमुळते होत गेलेले असतात. या प्राण्याचा रंग पाठीवर तांबडा असून त्यावर पिवळसर रंगाच्या टिपके वजा बारीक रेखा असतात. पोटाकडील भाग पांढरा असता. गळ्यावर तीन पांढरे पट्टे असतात. शेपूटही अगची छोटीशी असते.

वन्यजीव सप्ताह: तणमोराला वाचवायला हवं Lesser Florican

पिसोरी प्रामुख्याने सपाट किंवा उघड्या माळरानावर दिसत नाहीत. लाजाळू असल्याने त्यांना लपावयाला खडकाकपारीतील छोट्या छोट्या फटी, गुहा वगैरे जागा लागतात. ही हरणे उघड्यावर सहसा दिसत नाहीत, जंगली कुत्र्यांपासून आपला बचाव करण्यासाठी कधी ते आश्चर्यकारकरीत्या सरळसोट अशा झाडावरही चढतात. सकाळी कोवळ्या ऊन्हात, किंवा संध्याकाळी ऊन ओसरल्यावर ते चरण्यासाठी बाहेर पडतात. लहानशा आकारामुळे व एकंदर रंगामुळे तो सहसा दिसून येत नाहीत, झाडीतून पटकन पळाले तर रानकोंबडी किंवा तितर पळाल्यासारखे वाटते आणि लोक दुर्लक्ष करतात. नर व मादी जून जुलैच्या सुमारास एकत्र दिसून येतात.

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने जाणून घेऊ Caracal या भन्नाट प्राण्याची माहिती

जगभरात आशियायी पिसुरी हरिण आणि आफ्रिकी पिसुरी असे दोन ढोबळ प्रकार आढळतात. आशियायी पिसूरी हरणाच्या पाच उपजाती आढळतात. यांपैकी एक उपजात भारतात आढळते. भारतात प्रामुख्याने दक्षिण भारतातील जंगलात, पश्चिम भागातील जंगलात आणि ओरिसाच्या पूर्व किनाऱ्यावर, बिहार, मध्य प्रदेशात काही ठिकाणी त्यांचे अस्त्तित्व आहे.

निसर्गरंग वन्यजीव सप्ताह प्रश्नमंजूषा – WILDLIFE WEEK ONLINE QUIZ

महाराष्ट्रात पश्चिम घाटातील दाट जंगलांमध्ये पिसोरी हरिण आढळते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नाशिकमधील जंगलांमध्ये पूर्वी मोठी संख्या होती. गड किल्ल्यांच्या पायथ्या लगतच्या झाडोऱ्यामध्ये पिसोरी, रानडुकरे गिर्यारोहकांना नेहमी दिसायची. मात्र, गेल्या काही वर्षात रानडुकरांच्या बरोबरीने पिसोरी हरणांची शिकार वाढली आहे. वन विभागाकडून केल्या जाणाऱ्या कारवायांमध्ये अनेकदा पिसोरी हरणाची शिकार झाल्याची माहिती पुढे येते. अलीकडील काही वर्षात महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी भागातील वन विभागाने पिसोरी हरणांच्या शिकारीचे अनेक प्रकार उघडकीस आणले आहेत. चोरट्या शिकारींमुळे पिसोरी हरिण हळूहळू दुर्मिळ होते आहे. त्याला वाचवले पाहिजे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!