बिग कॅट अलायन्समुळे भारताची कॉलर ताठ Big Cat Alliance
बिग कॅट अलायन्समुळे भारताची कॉलर ताठ Big Cat Alliance

आपल्या पूर्वजांचे आभार मानावेत, तेवढे कमीच ! निसर्गाचे पूजन करण्याची संस्कृती त्यांनी आपल्याला बहाल केली आहे. भारतातील सण परंपरांचा धागा हा निसर्गातील प्रत्येक घटकाशी जोडला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना वाचविण्याची वेळ येते तेव्हा भारतीयांनी पुढाकार घेणे आवश्यकच आहे. देशातील वाघ्र संवर्धनाच्या चळवळीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात वाघांची संख्या वाढल्याची आनंदाची बातमी देत असतानाच आतंरराष्ट्रीय स्तरावरील बिग कॅट अलायन्सची Big Cat Alliance घोषणा केली.

वन्यजीवांचे संरक्षण हा कोणा एका देशाचा नव्हे तर वैश्विक मुद्दा आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य ही काळाची गरज आहे. असे सांगून त्यांनी संकटग्रस्त प्राण्यांच्या मदतीसाठी सगळ्यांनी एकत्र मदत करायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठीच आता बिग कॅट अलायन्स काम करणार आहे.

हेही वाचा: प्रोजेक्ट टायगर ची ५० वर्षे .. भारतात ३,१६७ वाघांची नोंद

आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सInternational Big Cat Alliance

जगभरात वेगवेगळ्या भागात राहणाऱा मार्जार कुळातील सात मोठ्या वन्यप्राण्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. यात वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, जॅग्वार, चित्ता आणि प्युमा या प्राण्याचा त्यात समावेश आहे. यातील वाघ देशातील पन्नास पेक्षा जास्त अभयारण्यांमध्ये वास्तव्यास आहेत. बिबट्या देशभरातील बहुतांश जंगलांमध्ये आणि राखीव वनांमध्ये राहतात. हिमबिबट्या अर्थात हिमालयाच्या पर्वतरांगांच्या कुशीत राहतात.

Puma

हेही वाचा: प्रोजेक्ट टायगर च्या पन्नाशी निमित्त ५० रुपयांचे विशेष नाणे

आफ्रिकन सिंह अर्थातच आफ्रिकेत, पण आपल्याकडे आशियाई सिंह गुजरात राज्यातील गीर या अभायरण्यामध्ये राहतात. गेल्या काही वर्षा दशकांमध्ये आशियाई सिंह इतर देशांतून नामशेष झाले असून जगात सध्या केवळ गीर अभयारण्यातच ते आढळतात. त्यामुळे त्यांना विशेष संरक्षण देणअयात आले आहे. चित्ते आत्तापर्यंत भारतात नव्हते. पण गेल्या वर्षी कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांचे कुटुंब पुनर्वसनासाठी दाखल झाले आहे. प्युमा आणि जॅग्वार आपल्या भागात नाहीत, दक्षिण अमेरिकेतील जंगलामध्ये राहतात. अमेझॉनमध्ये जॅग्वार प्रामुख्याने आढळतात.  

हेही वाचा: SARISKA व्याघ्र प्रकल्पात येणार अस्वल SLOTH BEAR

भारताच्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांना संरक्षण आहेच, त्यांची शिकार, हत्या हा कायद्याने गुन्हा असून तुरुंगवासाची शिक्षा होते.  दुर्दैवाने जगभऱातील अनेक देशांमध्ये वन्यप्राण्याची शिकार आणि वन्यजीव व्यापार सुरू आहे. मार्जार कुळातील प्राण्यांची कातडी, त्यांचे दात, नखांचा सौंदर्यप्रसाधनासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर त्यांचे हाडे, मांस आणि इतर अवयवांचा अंधश्रद्धेसाठी वापर केला जातो. अनेक आंतरराष्ट्रीय संस्था या शिकारी, तस्करी विरोधात आवाज उठवत आहेत. त्यांच्या या चळवळीला बिग कॅट अलायन्समुळे प्रोत्साहन मिळणार आहे. या उपक्रमामुळे जगभऱातील सदस्य देश आता या सात वन्यप्राण्यांच्या तस्करी आणि छुप्या व्यापार बंद करण्यासाठई प्रयत्न करणार आहेत. याशिवाय सदस्य देश त्यांचे अनुभव एकमेकांबरोबर शेअर करणार आहेत, या प्राण्यांच्या अधिवासाला संरक्षण संवर्धन,  संशोधन, संवर्धन, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीवरही भर देणार आहेत. इको टुरिझम अंतर्गतही या प्राण्यांचा वावर असलेल्या भागात लोकसहभागातून पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी भारताने घेतलेला हा महत्वाचा निर्णय आहे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!