जंगलात वास्तव्यास असलेल्या पक्ष्यांची संख्या आणि त्यांच्या प्रजाती जाणून घेण्यासाठी ग्रीन वर्क ट्रस्टतर्फे येत्या १० आणि १७ तारखेला कर्नाळा Karnala आणि फणसाड अभयारण्यामध्ये Phansad Wildlife Sanctuary पक्षी गणनेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पनवेल जवळील कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे तर फणसाड हे कोकण परिसरातील समुद्र किनाऱ्या जवळील निसर्गसंपन्न असे घनदाट जंगल आहे. या दोन्ही ठिकाणी पक्ष्यांमध्ये खूप विविधता असल्याने त्यांची माहिती संकलित करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हेही वाचा: माळढोक वाचविण्यासाठी BREEDING CENTER
ग्रीन वर्क ट्रस्टतर्फे आणि वन विभागाच्या सहभागातून आयोजित केलेली ही सातवी पक्षी गणना असून यामध्ये पक्षी अभ्यासक, तज्ज्ञांबरोबरच पक्षिमित्रांनाही सहभागी करून घेतले जाते. लाइन ट्रान्झिट पद्धतीने ही गणना केली जाते. यासाठी सहभागी झालेल्यांना वेगवेगळ्या टीम मध्ये विभागले जाते. या टीम निश्चित केलेल्या जंगलाच्या भागात फिरून दिसलेल्या पक्ष्यांच्या नोंदी घेतात. या टीम कोणता पक्षी दिसला, त्यांची संख्या, वेळ, त्याचे बिहेविअयर अशा सविस्तर नोंदी लिहून ठेवतात. आत्तापर्यंत या उपक्रमामध्ये विविध राज्यातील शालेय विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, पर्यावरणशास्त्राचे अभ्यासक, सर्व वयोगटातील पक्षी प्रेमी सहभागी झाले आहेत.
हेही वाचा : बर्ड मॅन ऑफ ऑफ इंडिया
संस्थेचा हा एकूण पाच वर्षांचा उपक्रम असून यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे या दोन्ही जंगलांमध्ये दिसणाऱ्या पक्ष्यांची विविधता आणि संख्येवर आधारित रिपोर्ट तयार करण्यात येणार आहे
दिपाली भोपळे, ग्रीन वर्क ट्रस्ट
आत्तापर्यंत झालेल्या सात पक्षिगणनेच्या उपक्रमात कर्नाळा अभयारण्यात जवळपास १९६ प्रकारचे आणि फणसाड अभयारण्यामध्ये २३० पेक्षा अधिक प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदी झाल्या आहेत. यामध्ये जंगलात राहणाऱया पक्ष्यांसह शिकारी पक्षी आणि निशाचर पक्ष्यांचीही नोंदी आहेत. जगभरातून दुर्मिळ होत असलेले गिधाड देखील गणनेच्या वेळी सहभागी झालेल्यांना दिसले. तसेच वैशिष्ट्यपूर्ण स्थलांतरी पक्ष्यांचीही नोंद गणनेमध्ये झाली आहे.
कर्नाळा पक्षी अभयारण्य पक्षी गणना : १० – ११ – १२ मार्च २०२३
फणसाड वन्यजीव अभयारण्य पक्षी गणना : १७ – १८ – १९ मार्च २०२३
नोंदणी सशुल्क ..
या गणनेमध्ये सहभागी होण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी संपर्क : 8779409460
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.