अंधश्रद्धा आणि वैयक्तिक कारणांसाठी वन्यजीवांची तस्करी हा वन्यजीवांच्या संख्येवर परिणाम करणारा प्रमुख मुद्दा आहे. नुकताच वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन Wildlife Welfare Association (WWA) या संस्थेने या प्रकाराला आळा घालण्यास हातभार लावला. संस्थेच्या विधी विभागाला मिळालेल्या माहितीनुसार आणि वनविभागाच्या मदतीने संयुक्त मोहीम राबविण्यात आली.
मालाड पूर्वेकडील एका पेट शॉप मधून सात ‘Star Tortoise – स्टार कासवे’ जप्त करण्यात आली. हि कासवे कुठून आली याचा मागोवा काढल्यावर समजले कि याचा विक्रेता क्रॉफर्ड मार्केट परिसरात आहे. त्या विक्रेत्याकडे नऊ ‘Black Spotted Turtles – ब्लॅक स्पॉटेड टर्टल्स’ आणि पाच ‘Alexandrine Parakeet – अलेक्सान्ड्रीन पॅराकीट’ जप्त करण्यात आले.
रोहित मोहिते मानद वन्यजीव रक्षक (ठाणे विभाग), मुंबई वन विभाग, आरएफओ राकेश भोईर आणि डब्ल्यूसीसीबी या सर्वांनी या कारवाईत सहभाग घेतला.
कासवांसाठी अहोरात्र झटणाऱ्या भाऊंना तुम्ही ओळखता का ?
कोणत्याही वन्यप्राण्याला ताब्यात ठेवणे वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या विरोधात आहे. शिक्षा म्हणून तुरुंगवास आणि दंड ठोठावला जाऊ शकतो. ताब्यात घेतलेले प्राणी वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. त्यांच्या वैद्यकीय अहवालाची खातरजमा करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल असे वनविभागातर्फे सांगण्यात आले.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com