जंगलातले सफाई कामगार : तरस - निसर्ग रंग
जंगलातले सफाई कामगार : तरस

दिसायला जरा विचित्र असला तरी तरस या प्राण्याला जंगलातला सर्वात महत्वाचा प्राणी मानले जाते, याचं कारण तुम्हाला माहिती आहे का ?
निसर्ग निर्माण केलेला प्रत्येक जीव म्हणजे अद् भूत चमत्कार आहे. मनुष्य वस्तीत होणारा कचरा साफ करण्यासाठी आपल्याला स्वतंत्र माणसं नेमावी लागतात. तंत्रज्ञानही आता विकसित करावे लागले आहे. तशीच यंत्रणा निसर्गानं शेक़डोवर्षांपूर्वीच जंगलातील निरुपयोगी घटकांची विल्हेवाट लावण्यासाठी केली आहे. विविध अधिवासात राहणाऱ्या काही प्राणी, पक्षी, किटकांना निसर्गानं स्वच्छतेची जबाबदारी नेमून दिली आहे. विशेष म्हणजे हे सफाई कामगार कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता, दिवस रात्र त्यांचे काम चोखपणे पार पाडतात.
निसर्गाचे सफाई कामगार असलेल्या प्राण्यांपैकी एक महाशय म्हणजे तरस. नुकत्याच आलेल्या द लायन किंग चित्रपटात एक गंमतीशीर वाक्य आहे.. हायनाज् टमी नेव्हर फुल… खरंच आहे तसं. तरसाबद्दल कौतुकाने बोलणारे लोक मोजकेच सापडतात. कारण तरस दिसायला कुरुप असतं.
तरस जंगला जवळ्याच एखाद्या गुहेत राहते. कधी कळपाने तर कधी एकटेच हे प्राणी फिरताना दिसतात. जंगलातील कुजलेले प्राणी, मेलेल्या प्राण्यांची हाडं, मासं खाऊन तरस हा प्राणी जगतो. निसर्गाने दिलेला बळकट जबडा आणि कमालीच्या पचनशक्तीमुळे तरस हाडं फोडतो आणि खाल्लेली हाडं पचवतो. वाघ, सिंहानी शिकार केली की ते मासं खातात, तिथं उरलेले मासांचे तुकडे आणि हाडांवर तरसाची नजर असते. तेच त्यांचं अन्न असतं. मागील दोन पाय खुरटे असलेले हे तरस जंगलात कुजलेलं खाद्यच शोधत फिरत असतं. माणसं हसतात, तसा त्याचा आवाज असतो. आफ्रिका आणि आशियामध्ये तरस आढळतात. गेल्या काही वर्षात तरसांची संख्या झपाट्याने कमी होते आहे. त्यांना राहण्यासाठी आवश्यक असलेला अधिवास कमी होतो आहे. जंगलातील माणसाचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे तरस धोक्यात आले आहेत. जंगलातले हे सगळे सफाई कामगार जर निघून गेले तर काय अवस्था होईल, याचा विचार करा.

टीम निसर्गरंग

Leave a comment