महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाव्दारे दिनांक २२ मे २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा World Biodiversity Day Celebration
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाद्वारे जागतिक जैवविविधता दिन World Biodiversity Day हरीसिंग सभागृह नागपूर येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी श्री. एम. श्रीनिवास राव, भावसे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमास श्री. जी. गुरुप्रसाद, भावसे, वनसंरक्षक (प्रादे) नागपूर, डॉ. विनिता व्यास, भावसे, उपवनसंरक्षक (प्रादे) नागपूर वनविभाग उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वटवृक्षास पाणी देऊन करण्यात आली.
डॉ. भारत सिंह हाडा, सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांनी कार्यक्रमात उपस्थित अतिथींचे स्वागत केले. त्यानंतर कु. पूनम पाटे, भावसे, संचालक, महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प यांनी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाची मुख्य संकल्पना (Theme) बाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाव्दारे प्रकाशित “वाघ म्हणजे जंगल नाही” या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे वार्षिक वार्तापत्र प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगी पुस्तकाचे लेखक श्रीमती दिव्यभारती, भावसे, व श्री. जयकुमारन, भावसे यांचा सत्कार मुख्य अतिथींच्या हस्ते करण्यात आला. तसेच “वाघ म्हणजे जंगल नाही” या पुस्तकाचा मराठी अनुवाद करणारे श्री. अरविंद आपले, भावसे से.नि. यांचाही आभासी पध्दतीने सत्कार करण्यात आला. Dragonflies and Damselflies of the Maharashtra State या मंडळामार्फत प्रकाशित पुस्तकांचे लेखक डॉ. आशिष टिपले व सहलेखक यांचा सुध्दा आभासी पध्दतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या वार्षिक वाटचालीचा प्रगती अहवाल मंडळाचे सदस्य सचिव डॉ. भारत सिंह हाडा, भावसे यांनी सादर केला.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथि श्री. एम. श्रीनिवास राव, भावसे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र राज्य यांनी त्यांचे मार्गदर्शनपर भाषणात मंडळातर्फे करण्यात येणाऱ्या कार्याची प्रशंसा केली. तसेच मंडळातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांचा व वार्षिक वार्तापत्राच्या प्रकाशनांची स्तुती केली. मुख्य अतिथी यांनी जैवविविधता संवर्धन, जैवविविधतेचा शाश्वत वापर या कार्यांमध्ये कार्यरत असलेल्या विविध संशोधन संस्थांचे सहकार्य प्राप्त करण्यासाठी त्यांचेशी समय समझोता लेख करण्याच्या सुचना दिल्यात, जेणेकरुन जैवविविधता संवर्धनामध्ये विविध सहभागीधारकांचा सक्रीय सहभाग घेणे शक्य होईल.
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त क्षेत्रीय वनाधिकारी, कर्मचारी, स्वंयसेवी संस्था इत्यांदिकरीता जैविक विविधता अधिनियम २००२ संबंधि प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणाची सुविधा जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध व्हावी याकरीता आभासी पध्दतीचा अवलंब करण्यात आला. सदर प्रशिक्षणामध्ये श्री. रविंद्र वानखडे, प्रकल्प अधिकारी यांनी कायद्याच्या पाश्वभुमिबाबत सखोल माहिती दिली. तसेच श्रीमती रुपाली सावंत, विभागीय वन अधिकारी यांनी कायद्याचे क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी करणेबाबत तांत्रीक माहिती दिली. श्रीमती श्वेता आडे, सहाय्यक वनसंरक्षक यांनी जैविक विविधता (जैविक संसाधन व त्यासंबंधीत पारंपारिक ज्ञानाची उपलब्धता आणि लाभांचे योग्य व समन्यायी वाटप) विनियमन, २०२५ याबाबत उपस्थितांना माहिती अवगत करुन दिली. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळातर्फे राज्यातील विविध जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना वाटप करण्यात आलेल्या रु. ८१२.०० लक्ष निधी वितरण व वापर करण्यात आलेल्या जैविक संसाधनांबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच महाराष्ट्र राज्यातील जैवविविधता वारसा स्थळांबद्यल माहिती दिली. सदर प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थितांच्या प्रश्नांना सादरकर्त्यांनी व मान्यवरांनी उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन करण्यात आले. सदर कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार प्रदर्शन श्रीमती रुपाली सावंत, विभागीय वन अधिकारी यांनी केले, या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती श्वेता आडे, सहाय्यक वनसंरक्षक यांनी केले.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.
