Great Indian Bustard माळढोक वाचविण्यासाठी Breeding Center
माळढोक वाचविण्यासाठी Breeding Center

महाराष्ट्रातून नामशेषाच्या मार्गावर असलेल्या माळढोक Great Indian Bustard पक्ष्याला वाचविण्यासाठी, त्यांची संख्या वाढविण्याच्या हेतूने सोलापूर जिल्ह्यात राज्यातील पहिले ‘माळढोक Conservation Breeding Center’ उभारण्यात येणार आहे. माळढोक पक्ष्यासाठी राखीव असलेल्या सोलापूरमधील नान्नज अभायरण्यातील जागा या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षात देशातील माळढोक पक्ष्यांची संख्या वेगाने घटली आहे. महाराष्ट्रात पूर्वी नान्नज अभयारण्यामध्ये २५ पेक्षा जास्त माळढोक वास्तव्यास होते. मात्र शिकारी, वाढता मानवी हस्तक्षेप आणि त्यांची वसतिस्थाने असुरक्षित झाल्याने त्यांची संख्या कमी होत गेली. माळढोक पक्ष्याची मादीत वर्षातून एकदा एकच अंड देते, त्यामुळे इतर पक्ष्यांप्रमाणे त्यांच्या पिल्लांची संख्या वेगाने वाढत नाही. आता नान्नजमध्ये परिसरात केवळ एकच पक्षी राहिला आहे. त्यामुळे वन विभागाने या पक्ष्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रजननात्मक संवर्धन प्रकल्प आराखडा तयार केला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी देखील या प्रकल्पात सहभागी झाली आहे. गेल्याच महिन्यात वनाधिकाऱ्यांनी जागा निश्चित केली आहे. आता राजस्थानमधील जैसलमेरमधून माळढोकची दोन अंडी आणि नर-मादीची जोडी मागविण्यात आली आहे.

हेही वाचा: सह्याद्रीतल्या अंजनीची भुरळ

महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात माळढोकची संख्या चिंताजनक आहे. देशात सध्या सव्वाशे ते दीडशेच हे पक्षी शिल्लक असल्याचे अभ्यासक सांगतात. माळढोक हा राजस्थानचा राज्य पक्षी आहे. काही वर्षांपूर्वी तेथील सरकारने माळढोकची संख्या वाढविण्यासाठी जैसलमेर येते माळढोक संवर्धनात्मक प्रजनन प्रकल्प सुरू केला आहे. याच धर्तीवर सोलापूरमध्ये हा प्रकल्प सुरू होणार आहे.

हेही वाचा: कोट्यावधी रुपयांची व्हेल माशाची उलटी ??

संवर्धनात्मक प्रजनन प्रकल्पामध्ये अनेक नियमांचे कटाक्षाने पालन केले जाते. या केंद्रात केवळ प्रजनन करून प्राण्यांची संख्या वाढवली जात नाही. त्यांना नैसर्गिक वातावरणात राहण्यासाठी स्वावलंबी करण्यासाठीही पूरक प्रशिक्षण दिले जाते. यासाठी वन्यजीव अभ्यासक आणि डॉक्टरांचा ताफा पूर्णवेळ तैनात असतो. मात्र हे करताना त्यांचा माणसांशी संपर्क येणार नाहीत, याचीही काळजी घेतली जाते. प्रकल्पात कृत्रिमरित्या माळढोकची अंडी उबवली जात असली तरी भविष्यात हे पक्षी निसर्गातही सोडले जातात. भारतात गिधाडांच्या संवर्धनासाठी अशा प्रकारचा प्रकल्प काही वर्षांपूर्वी सुरूकरण्यात आला आहे आणि तो यशस्वी ठरला. माळढोक प्रकल्पालाही असंच यश मिळू दे, अशी प्राणिप्रेमींची इच्छा आहे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!