यंदाचे वर्ष भरडधान्याचे Year of Millets
यंदाचे वर्ष भरडधान्याचे Year of Millets

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य वर्ष” International Year of Millets 2023 म्हणून घोषित केले आहे.  यानिमित्ताने भरड धान्ये आपल्या सगळ्यांच्या आहाराबरोबरच भारतासाठी देखील कशी महत्वाची ठरणार आहेत हे आपण जाणून घेऊ या…

भारतासाठी भरडधान्य महत्वाची

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने भरडधान्य वर्ष जाहीर केल्यावर भारताने लगेच हा प्रस्वात स्वीकारला. कारण आपल्याकडे सिंधू संस्कृतीपासून भरडधान्य वापरले जात असल्याचे पुरावे सापडतात. भारतात भरड धान्यांचे १७० लाख टनांपेक्षा जास्त उत्पादन होते.  विशेष म्हणजे भरडधान्यांचे आशिया खंडातील ८० टक्के पेक्षा जास्त उत्पादन भारतात घेतले जाते. आशिया आणि आफ्रिका खंडातील सुमारे साठ कोटी लोकांच्या पारंपरिक आहारात भरड धान्याचा समावेश आहे. नव्या धोरणाच्या निमित्ताने भारताने भरड धान्याच्या उत्पादनाचे जागतिक केंद्र बनण्याची तयारी सुरू केली आहे.

Millets भरडधान्य

ही आहेत भरडधान्य

आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्चित केलेल्या अकरा महत्त्वाच्या भरडधान्यापैकी ९ भरडधान्ये भारतामधील आहेत. प्रांतरचनेनुसार वेगवेगळ्या भागात त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. ज्वारी, बाजरी, भगर (वरई), राळ, राजगिरा, कुटकी, सेंद्री, बर्टी, सावा,कोदो, छाना, कंगनी इत्यादी

भरडधान्य का महत्वाची

  • या धान्यातून लोह, प्रथिने, फायबर, कॅल्शियम मिळते
  • झिंक आयोडिन, खनिजे, भरपूर जीवनसत्वे असतात.
  • प्लूट्रेनमुक्त धान्य.
  • कमीं ग्लायर्सेर्मिक इंडेक्स.
  • पचनास हलकी असल्याने लहान मुलांच्या आहारात समावेश असतो.
  • रोग प्रतिकारकशाक्ती वाढते
  • कुपोषण टाळता येऊ शकते
  • मधुमेह, ह्दयविकार, ॲनिमिया, उच्च रक्तदाब रोधक आहेत

भरडधान्यांचे हे पदार्थ प्रसिद्ध

भगरीचे थालीपीठ, आप्पे, उपवासाची भगर, राळीची खीर, रागजगिऱयाचे दामटे, लाडू, दाण्याची आमटी, नाचणीची भाकरी, सत्व, धिरडे, इडली, डोसा अनेक ठिकाणी बनवले जातात. अलीकडे भऱडधान्याच्या पाककृतींच्या स्पर्धाही सुरू झाल्या आहे. या पीठांपासून केक, बिस्किटे, ब्रेडस, नूडल्स बनविण्याचेही प्रयोग सध्या सुरू आहेत. एका स्पर्धेमध्ये भरडधान्यापासून पिझ्झा बनविण्याचा प्रयोगही नुकताच यशस्वी ठरला. एवढंच नव्हे तर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) त्यांच्या मेन्यू कार्डवरही आता भरडधान्यांच्या पदार्थांचा लवकरच समावेश होणार आहे.

हेही वाचा : MTDC साजरे करणार आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष

हवामान बदलांशी सामाना

भरडधान्यांची शेतकऱयासाठी अजून एक महत्वाची बाब म्हणजे ही बहुतांश पीके ही स्थानिक वाण (local crop) असल्याने प्रतिकूल परिस्थितीतही तग धरतात. हवामान बदलामुळे होणारी तपमान वाढ, पावसाची अनियमितता, दुष्काळ, तसेच ग्रीन हाऊस गॅसेसचे वाढते प्रमाण या प्रतिकूल परिस्थितीशी समाना करण्यास ही पिके समर्थ आहेत. विशेष म्हणजे ही पीके जास्त कार्बन शोषून घेऊन अधिक उत्पादन देतात

आपल्याकडे गेल्या तीस चाळीस वर्षात भरडधान्य हे गरिबांचे धान्य असा दृष्टिकोन तयार झाला होता. त्यामुळे हळूहळू ही धान्य आपाल्या आहारातून बाहेर कधी पडली हे कळालेच नाही. त्यांची जागा गहू-तांदळांने घेतली आहे. पण केवळ गहू-तांदूळ तुम्हाला सशक्त आणि पोषणमूल्य देणारे अन्नधान्य ठरू शकत नाही. गेल्या काही वर्षात वाढत असलेल्या साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी, सक्षम होण्यासाठी भरडधान्यच आपले तारणहार होऊ शकते. भरडधान्याला आपल्या अन्नसाखळीचा अविभाज्य भाग बनणे गरजेचे आहे. असे आवाहन BAIF संस्थेचे विश्वस्त गिरीश सोहनी यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या किर्लोस्कर वसुंधऱा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये केले.

हेही वाचा: भरडधान्य (MILLETS) आपल्या अन्नसाखळीचा अविभाज्य भाग बनणे गरजेचे

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!