1690 Leopards Recorded in Maharashtra
राज्यात सतराशे बिबट्यांचे वास्तव्य Leopards in MH

वाघांची गणना करून जशी आकडेवारी जाहीर केली जाते, तशीच माहिती काही दिवसांपूर्वी बिबट्यांची गणना करून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केली. स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया Status of Leopard in India या अहवालातून बिबट्यांच्या संदर्भातील अनेक बाबी समोर आल्या. त्यानुसार आपल्या देशात १२ हजार ८५२ बिबटे असल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातही १६९० बिबट्यांची नोंद झाली आहे.

बिबट्यांची मोजणी २०१८ मध्ये झाली असून, केवळ जंगलांमध्ये राहणाऱ्या बिबट्यांची मोजणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात महाराष्ट्रासह इतर राज्यात जंगलाबाहेर राहणाऱ्या बिबट्यांचे प्रमाण अधिक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे हे आकडे फक्त जंगली बिबट्यांचे आहेत.

अहवालामध्ये दिलेल्या माहितीनुसार देशात सर्वाधिक बिबटे मध्य प्रदेशमध्ये आढळले आहेत. मध्य प्रदेश वाघांचे राज्य म्हणूनही ओळखले जाते. सध्या तिथे ३ हजार ४२१ बिबटे आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक असून, तिथे १७८३ बिबटे आहेत. बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. २०१४ मध्ये झालेल्या गणनेमध्ये देशात ७ हजार ९१० बिबटे आढळले होते. यंदा मात्र बिबट्यांची संख्या साठ टक्क्यांनी वाढून १२ हजार ८५२ वर पोहोचली आहे.

बिबट्यांचा अभ्यास करणारी विद्या

या उपक्रमासाठी बिबट्यांची कॅमेरा ट्रॅपमधून छायाचित्रे काढून तसेच, त्यांची विष्ठा तपासून गणना करण्यात आली. यासाठी वेगवेगळ्या जंगलात २६ हजार ८३८ कॅमेरे लावण्यात आले होते. त्यातून ५१ हजारांहून अधिक बिबट्यांची छायाचित्रे मिळाली. अभ्यासकांनी त्यातून रोझेंट पॅटर्नच्या आधारे वेगवेगळ्या बिबट्यांची ओळख पटवली. कारण प्रत्येक बिबट्याच्या शरीरावरील ठिपक्यांचे आकार वेगवेगळे असतात. आपल्याला सगळेच बिबटे सारखे दिसले, तरी अभ्यासकांना ठिपक्यांच्या आधारे फरक ओळखता येतो.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

Leave a comment

error: Content is protected !!