पर्यावरण जागृती तसेच व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याच्या हेतूने व नवीन वर्षाचा संकल्प म्हणून मूळचा भोर तालुक्यातील अभिषेक सूर्यकांत माने या युवकाने पुणे ते आंध्रप्रदेशमधील तिरुपती (बालाजी देवस्थान) हा प्रवास एकट्याने सायकलवर केला. अवघ्या ७ दिवसात अभिषेकने १२०० किलोमीटर हून जास्त अंतर पार केले. पुण्यातील श्री. शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयात अभिषेक…
