आपल्या मराठी संस्कृती आणि परंपरांमध्येही कडुनिंब या वृक्षाला महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाचा आरंभही कडुनिंबाची पाने खाऊन होतो. या दिवशी गुढी उभी करताना त्यातही कडूनिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तर आज जाणून घेऊया कडुनिंबाविषयी. महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात वाढणारा औषधी गुणांचा वृक्ष म्हणजे कडुनिंब.…
