महाबळेश्वर एवढेच लोकप्रिय ठरलेले माथेरानही निसर्गसौंदर्याने नटलेले ठिकाण आहे. तिथे झाडांमध्येही खूप विविधता असल्यामुळे तिथे राहणारे पक्षी आणि फुलपाखरांमध्येही खूप विविधता आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी या संस्थेचे संशोधक गेल्या नऊ वर्षांपासून माथेरानमध्ये फुलपाखरांचा अभ्यास करत होते. या अभ्यासकांनी केलेल्या संशोधनाचा अहवाल त्यांनी आता लोकांसमोर…
