रत्नागिरीतील आंजर्ले समुद्र किनाऱ्यावरून या वर्षीच्या हंगामातील ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांची पहिली बॅच समुद्राकडे रवाना झाली. कासव संवर्धनात सहभागी झालेल्या तरुणांनी सोशल मीडियावर हा सोहळा लाइव्ह दाखवला. आई बरोबर नसताना पिटुकली पिल्लं धिटाईने तुरूतुरू अथांग पसरलेल्या समुद्राच्या दिशेने एकटीच चालत जाताना बघण्याचा सोहळा काही निराळाच…
