अंधारबन नेचर ट्रेल बंद Andharban Nature Trail Closed
पुणे जिल्हा आणि परिसरात पावसाचा जोर लक्षात घेता जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. याचाच परिणाम म्हणून अंधारबन नेचर ट्रेल आणि ट्रेक Andharban Nature Trail करण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत आहे व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
सुधागड वन्यजीव अभयारण्यातील अंधारबन नेचर ट्रेल येथे पर्यटकांची होणारी अनियंत्रित गर्दी, अभयारण्य क्षेत्रातील पर्यटकांच्या प्रवेशामुळे वन्यप्राणी तसेच वन्यजीव अधिवासाला हानी विचारात घेता असल्याने या भागातील पर्यटन काही कालावधीसाठी बंद करण्याबाबत करण्यात आले आहे.
हेही वाचा: पावसाळ्यातील साहसी पर्यटनातील धोके आणि घ्यावयाची काळजी
वन्यजीव विभागाकडे असलेल्या मर्यादित मनुष्यबळाकडून पर्यटकांना नियंत्रित करण्यास अडचणी येत आहेत. अभयारण्यातील पर्यटकांचा प्रवेश प्रतिबंधित करणे, वन्यजीवास होणारा संभाव्य धोका टाळणे व पर्यटकांची सुरक्षितता राखणे इत्यादी बाबींचा विचार करून वन विभागाकडून सुधागड वन्यजीव अभयारण्यातील अंधारबन नेचर ट्रेल व कुंडलिका व्हॅली ही दोन्ही पर्यटन स्थळे दि. ४ जुलै २०२५ पासून पुढील आदेशापर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आली आहेत.
ही दोन्ही ठिकाणे वन्यजीव अभयारण्याक्षेत्रात समाविष्ट असल्याने या क्षेत्रात विनापरवाना प्रवेश पुढील कालवधीत प्रतिबंधित राहील. या आदेशाचे कोणतीही व्यक्ती / संस्था / संघटना यांनी उलंघन केल्यास ते वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ५१ मधील तरतुदी व प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई व शिक्षेस पात्र राहतील अशी माहिती राहुल गवई, उपवनसंरक्षक (वन्यजीव) ठाणे यांनी आज पत्रकामार्फत दिली आहे
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.