विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग यांचे वतीने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आंतरशालेय पोस्टर प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. “सृष्टी, वृष्टी आणि मानव” हा स्पर्धेचा विषय आहे.
हजार शब्दांची ताकद एका चित्रात असते.चित्रकला, रंगसंगती, आविष्कार, संवादी भाषा, विषयातील नेमकी व अचूक माहिती पोस्टरमध्ये असते. त्यामुळे विद्यार्थी नी हे पोस्टर हे मोजक्या शब्दात चित्र-आलेख यांच्या सहाय्याने तयार करायचे आहे. दहा आणि बारा पोस्टरांच्या मालिकेतून प्रबोधनाचा विषय मांडता येतो.
हिवाळा, उन्हाळा, पावसाळा यांचे चक्र हे आपल्या भूभागाला मिळालेले वरदान आहे. ते समजून घेऊन आपल्या पूर्वजांनी आपली संस्कृती घडवली, सणवार निर्माण केले. निसर्ग चक्रात होणारा बदल कसा सोसायचा याचे तंत्र विज्ञान विकसित केले. मात्र खूप मोठा मानवी हस्तक्षेप सृष्टी आणि वृष्टी चा संबंध बिघडवायला कारणीभूत ठरत आहे का – अशी शंका येण्याची परिस्थिती आज दिसत आहे.
हेही वाचा: एकदांडीला वाचविण्यासाठी एकवटले निसर्गप्रेमी
सृष्टीचक्रातील कोणता हस्तक्षेप मानवी अस्तित्वाला तारक आणि कोणता मारक याची समज वाढवली पाहिजे. आसपास होत असणाऱ्या – पूर, भूस्खलन, ढगफुटी, अवकाळी पाऊस, यासारख्या संकंटानी मानवी वस्त्या, शेतेभाते, जीवन, मालमत्ता उध्वस्त होताना दिसतात. त्या संकंटांची कारणे शोधून उपाय योजले पाहिजेत. उद्याच्या पिढ्यांना समृद्ध सृष्टी मिळाली पाहिजे यासाठी आज काय करायला पाहिजे? याबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी पोस्टर प्रदर्शन स्पर्धा २०२४ घेण्यात येत आहे.
या स्पर्धेत ५ विद्यार्थी विद्यार्थिनींचा गट सामील होऊ शकतो. (१२ वी पर्यंत)
एका शाळेतून एकापेक्षा अधिक गट भाग घेऊ शकतात.
शाळाबाह्य गटही भाग घेऊ शकतात. (१७ वर्षे पर्यंत)
एका गटाला प्रवेश फी रुपये ३०० फक्त. मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाच्या खात्यावर पैसे जमा करू शकता
Account Name: Marathi Vidnyan Parishad Pune Vibhag
Bank: IDBI Bank, Sadashiv Peth, टिळक रोड, पुणे-३० (स. प महाविद्यालयाजवळ)
Account No.: 49010010077236
IFSC CODE-IBKL0000490
विषयाच्या अधिक माहितीसाठी आणि पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी एक कार्यशाळा, शनिवार, दिनांक १७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील शाळांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे
हेही वाचा: रानभाज्यांचा हंगाम झाला सुरू
पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे वेळापत्रक
१७ ऑगस्ट – कार्यशाळा सकाळी १०.३० ते ४.३०
स्थळ – इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, नवी पेठ, म्हात्रे पुलाजवळ, पुणे ३०
(या कार्यशाळेत भाग घेता आला नाही तरीपण स्पर्धेत भाग घेता येईल.)
२४ ऑगस्ट– पहिली फेरी (पोस्टर्सचे परीक्षण ऑनलाईन) आपल्या प्रत्येक पोस्टरचा फोटो तसेच स्पर्धक गटाचा फोटो mavipa.pune@gmail.com येथे ईमेल करावा
२४ ते २८ ऑगस्ट – दुसरी फेरी (पोस्टर्सचे जाहीर प्रदर्शन विविध पाच ठिकाणी. दिनांक, वेळ, जागा, आधी कळवावी. त्यापैकी कोठेही परीक्षक येऊ शकतील)
२९ ऑगस्ट – तिसरी फेरी (अहवाल नोंदणी ऑनलाईन. यात प्रेक्षकांचा प्रतिसाद, संख्या, प्रश्नोत्तरे, सहभागी विद्यार्थी, मार्गदर्शक, यांचा प्रतिसाद व प्रत्येक ठिकाणचे दोन फोटो असावेत. संध्याकाळी ६ पूर्वी पाठवावे)
१ सप्टेंबर – निवडक संघांची अंतिम फेरी (प्रदर्शन कथन), निकाल आणि बक्षीस समारंभ. स्थळ – पिंपरी चिंचवड सायन्स पार्क. वेळ – दुपारी ४
अधिक माहितीसाठी संपर्क:
शशीताई भाटे 9420732852
Email: mavipa.pune@gmail.com
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.