गोष्ट फड्या निवडुंगाची Bramhakamal Saussurea Obvallata
गोष्ट फड्या निवडुंगाची Bramhakamal Saussurea Obvallata

घराशेजारच्या बागेत, गच्चीमध्ये, गॅलरीमध्ये कुंड्यांमध्ये फुलणारे ब्रह्मकमळ अनेकांना आवडते. पावसाळा सुरु झाला की या झाडाला फुले यालला सुरुवात होते. या ब्रह्मकमळाची फुल रात्री बाराच्या दरम्यान संपूर्ण फुलतात. काही घरांमध्ये तर एकावेळी शंभर दीडशे फुलेही येतात. अशा वेळी आजूबाजूच्या घरांमधील, गल्लीतील लोकं ही फुल बघायला रांगा लावतात, फोटो काढतात. इंटरनेटवरही त्यांचे फोटो अनेकजण शेअर करतात. Bramhakamal Saussurea Obvallata

पण तुम्हाला एक गंमत माहिती आहे का, आपण या झाडाला ब्रह्मकमळ म्हणत असलो तरी या झाडाचे मूळ नाव फड्या निवडुंग आहे. खरे ब्रह्मकमळ हे हिमालयात आढळते. ते पर्वतरांगाच्या टोकांवर फुलते. त्याची फुलेही रात्री उमलतात, एवढेच या दोन फुलांमध्ये साम्य आहे. हिमालयातील ब्रह्मकमळाला सॉसूरिया ऑबव्हॅलाटा Saussurea Obvallata असं शास्त्रीय नाव आहे. त्याचा वास खूप उग्र असतो. उमलेल्या फुलाचा वास घेतला तर चक्कर येते, असे अभ्यासक म्हणतात.

ब्रह्मकमळ – Saussurea Obvallata (स्त्रोत – मराठी विश्वकोश)
या फुलाला उत्तराखंड राज्याने राज्यफुलाचा दर्जा दिलेला आहे

हेही वाचा: रानभाज्यांचा हंगाम झाला सुरू

फड्या निवडूंग हे झुडूप प्रकारातील असल्याने पावासाळा सुरु झाला की त्याला फुले येतात. ती दिसायला आकर्षक आणि नाजूक असतात. निसर्गाने निवडूंगाला काटेरी आणि ओबडधोबड बनवलं असलं तरी त्याला येणारी फुले मात्र खूप सुंदर आणि रंगीत असतात. आपल्याकडे सहसा घराच्या गच्चीत, बागेत कधीच निवडूंग लावलं जात नाही,  ते नेहमीच डोंगर उतारांवर, खुरट्या जंगलांमध्ये बघायला मिळते. गावांमध्ये घराला, शेताला कुंपण म्हणूनही वेगवेगळ्या प्रकारची निवडूंग लावली जातात. आपल्या गावांमध्ये, शहरात दिसणाऱ्या फड्या निवडूंगाला ब्रह्मकमळ हे नाव कोणी दिले हे माहिती नाही. पण या निमित्ताने फड्या निवडुंग अनेकांच्या बागांमध्ये लाडालाडाने वाढते आहे, त्याची छान काळजी घेतली जाते आहे.

हेही वाचा: प्रत्येक पाऊस मुसळधार नसतो 

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!