35th Maharashtra Pakshimitra Sammelan महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन
३५ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन अध्यक्षपदी राजकमल जोब यांची निवड

महाराष्ट्र पक्षिमित्र ही संस्था राज्यात गेली चार दशके राज्यात कार्यरत आहे. पक्षी अभ्यास, संवर्धन व जनजागृती यासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेची राज्यस्तरीय तसेच विभागीय स्तरावर पक्षिमित्र संमेलने होत असतात. राज्यभरातील पक्षी मित्रांनी एकत्रितपणे संमेलने घडवून आणणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. या वर्षीचे चे ३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन चंद्रपूर येथे इको-प्रो या संस्थेच्या यजमानपदाखाली वन अकादमी चंद्रपूर येथे दि. ११ ते १२ मार्च २०२३ दरम्यान होत आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून जेष्ठ पक्षी अभ्यासक राजकमल जोब यांची निवड करण्यात आली आहे.

Rajkamal Job Pakshimitra Sammelan

राजकमल जोब हे पक्षिमित्र चळवळीतील जेष्ठ सभासद असून अगदी सुरुवातीच्या काळापासून या चळवळीसोबत जुळलेले आहेत. १९८२ पासून पक्षी निरीक्षणास सुरुवात करून त्यांनी भंडारा येथे प्रथमच भंडारा नेचर क्लब स्थापन करून त्या माध्यमातून पक्षी आणि पर्यावरण चळवळ निर्माण करण्यात मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी आजवर संघटनेचे कार्य केलेले असून विदर्भ स्तरीय संमेलनांचे आयोजन सुद्धा केलेले आहे. १९९५ साली नागपूर येथे पार पडलेल्या चौथ्या विदर्भ पक्षिमित्र संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी भंडारा जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक म्हणून सुद्धा अनेक वर्षे कार्य केले असून भंडारा जिल्ह्यातील तलावांची जैवविविधता व तलावांचे पुनरुज्जीवन यासाठी भरीव कार्य केले आहे.

महाराष्ट्र पक्षिमित्र राज्य कार्यकारिणी तर्फे राजकमल जोब यांची एकमताने निवड करण्यात आल्याची महिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली आहे.

हेही वाचा : बर्ड मॅन ऑफ ऑफ इंडिया

संमेलनात प्रामुख्याने माळढोक पक्ष्यांची राज्यातील परिस्थिती, सारस पक्षी संवर्धन व त्यापुढील आव्हाने या विषयांवर व्याख्यान, परिसंवाद तसेच सादरीकरण करण्यात येईल. संकटग्रस्त ‘सारस व माळढोक’ या पक्षी संवर्धनासाठी देश पातळीवरील प्रयत्न व भविष्यातील वाटचाल, पक्षी अधिवास संवर्धन, पक्षी संवर्धन, राज्यातील नविन रामसर स्थळांची निर्मिती व रामसर स्थळांची सध्यस्थिती, पक्षी संशोधन, अभ्यास व संवर्धन संबंधित विषय तसेच नवोदित पक्षिमित्रांचे अनुभव इत्यादि विषय या संमेलनात हाताळण्यात येतील. आयोजकांतर्फे माहितीपट स्पर्धा तसेच छायाचित्र स्पर्धेचे आयोजन पण करण्यात आले आहे.  

हेही वाचा: माळढोक वाचविण्यासाठी BREEDING CENTER

संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी “उदयोन्मुख पक्षीनिरीक्षक” व “उदयोन्मुख पक्षिमित्र” पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या वर्षी अनुक्रमे अमृता गंगाधर आघाव आणि यशश्री यशवंत उपरीकर यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.  

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!