शिवरायांच्या किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज साइटचा मान? Maharashtra Forts in UNESCO World Heritage List
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या तज्ज्ञ समितीने शुक्रवारी रात्री जागतिक वारसा स्थळाचा सन्मान जाहीर केला. महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध ऐतिहासिक वारसा स्थळाचा हा मोठा बहुमान ठरला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड किल्ले केवळ वास्तू नसून सर्वांना प्रेरणा आणि जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून इतिहास अभ्यासक, किल्लेप्रेमी आणि राज्य सरकारतर्फे करण्यात सुरू होते. पॅऱिसमध्ये सध्या सुरू असलेल्या जागतिक वारसा स्थळ तज्ज्ञ समितीच्या बैठकीमध्ये शुक्रवारी भारतीय वेळनुसार आठ वाजता भारताच्या मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या प्रस्तावावर मतदान सुरू झाले. सर्वच देशांनी यास सकारात्मक प्रतिसाद देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमाचे कौतुकही केले.
सर्वानुमते मिळालेल्या होकारामुळे समितीच्या अध्यक्षांनी महाराष्ट्राच्या किल्ल्यांना म्हणजेच मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या प्रस्तावाला जागतिक वारसा स्थळ (वर्ल्ड हेरिटेज साइट)चा मानांकन जाहीर केले
राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या वतीने आणि भारतातर्फे ‘भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ जागतिक वारसा नामांकन पाठवले होते. जागतिक वारसा समितीच्या ४६ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि युनेस्को सभासदांसमोर भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी भारताची बाजू मांडली.
वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये समावेश झालेले किल्ले महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी, राजगड, प्रतापगड हे ११ आणि तमिळनाडू येथील जिंजी अशा १२ किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे.
Header Image Source: https://x.com/UNESCO/status/1943693157012590903
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.