अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील, यांच्या स्मृती प्रित्यर्थ, कुटुंबियाकडून वनविभागास दोन एकर जमीन दान Papa Patil Donates 2 Acres Land to Sahyadri Tiger Reserve
अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील हे सांगली जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक होते. ते राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य देखील राहिले आहेत. वन्यजीवांच्या रक्षणासाठी त्यांनी सदैव उत्साहाने सहभाग नोंदवला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उभारणी व जडणघडण विकासासाठी संवर्धनाच्या कार्यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मार्फत सुरू असणाऱ्या निसर्ग पर्यटन विकासामध्ये योगदान देण्याची त्यांची तीव्र इच्छा होती.
सदर इच्छेच्या अनुषंगाने त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती सुरेखा पाटील, कन्या सौ.रत्नप्रभा व सौ. गौरी यांच्यासह सर्व कुटुंबियांनी विचार विनिमय करून कै. अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्व:मालकीची मौजे :पानेरी तालुका पाटण, जिल्हा सातारा, येथील दोन एकर जमीन बक्षीस पत्राद्वारे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान यांच्या नावे करून दिली. सदर जागेवर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून पापा पाटील यांच्या स्मरणार्थ निसर्ग पर्यटन संकुल उभारण्याचे नियोजन आहे.
हेही वाचा: Cyclone Fengal
पापा पाटील यांच्या कुटुंबियांनी केलेल्या सहकार्याबद्दल डॉ. क्लेमेंट बेन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक – वन्यजीव पश्चिम प्रदेश मुंबई , तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर एम रामानुजन यांनी त्यांचे आभार मानले.
या कार्यामध्ये रोहन भाटे व नाना खामकर यांचे अनमोल सहकार्य लाभले.
पापा पाटील यांनी आपल्या आयुष्यातील जवळपास 5 दशके पश्चिम महाराष्ट्रातील वनसंवर्धनासाठी वाहून घेतली होती.
त्यांनी बत्तीसशिराळा जिवंत नागपंचमीच्या प्रदर्शना बाबत जनहित याचिका दाखल केली होती आणि बत्तीसशिराळा येथे बेकायदेशीर जिवंत सर्प प्रदर्शन थांबवले होते. तसेच त्यांनी चांदोली भागातील बेकायदेशीर बॉकसाईट खाणकाम विरोधात जनहित याचिका दाखल केली होती.
ते सांगली जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक होते. व महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य देखील राहिले आहेत.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.