Occultation of Saturn by the Moon 14 October 2024
१४ ऑक्टोबरच्या रात्री चंद्र शनी ग्रहाला आपल्या मागे झाकणार Occultation of Saturn by the Moon

१४ ऑक्टोबरच्या रात्री चंद्र शनी ग्रहाला आपल्या मागे झाकणार Occultation of Saturn by the Moon

येत्या १४ ऑक्टोबरच्या रात्री चंद्र शनी ग्रहाला आपल्या मागे झाकणार आहे. जसा चंद्र सूर्य ग्रहणाच्या वेळी सूर्याला आपल्या मागे झाकतो, तसं जेव्हा एक खगोलीय पदार्थ दुसऱ्या खगोलीय पदार्थाला आपल्या मागे झाकतो तेव्हा याला पिधान असे म्हणतात.

शनीचे हे पिधान संपूर्ण भारतातून दिसणार आहे. हे पिधान आपल्याला नुसत्या डोळ्यांनी पण दिसु शकेल. पर तुमच्या कडे एखादी लहान दुर्बिण असेल किंवा एखादी द्विनेत्री – बायनोक्यूलर असे तर या पिधानाचे तुम्हाला चांगले निरिक्षण करता येईल. आणि खगोलिय दुर्बिण असेल तर शनीची कडी सुद्धा दिसतील.

निरिक्षणास रात्रीच्या सुमारे ११ः३० वजल्या पासून सुरवात करावी. चंद्राच्या पूर्वेला तुम्हाला शनी सहज ओळखता येईल. तुम्हाला दिसेल की शनी आणि चंद्र एक मेकांच्या जवळ येत आहेत. आणि मग चंद्र हळू हळू शनीला आपल्या मागे झाकेल. त्या नंतर सुमारे तास भरा नंतर आपल्याला शनी परत एकदा चंद्राच्या मागून बाहेर येताना दिसेल अशी माहिती नेहरू प्लॅनेटेरियम चे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली.

शनीच्या या पिधानाच्या वेळा वेगवेगळ्या शहरांसाठी वेगवेगळ्या असती. या वेळा खालील संकेत स्थळावर दिल्या आहेत.

Occultation of Saturn by the Moon | Celestial events for viewing pleasure (wordpress.com)

सात साल बाद

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!