वन्यजीव सप्ताह २०२४, पुणे वन विभाग आणि RESQ चॅरिटेबल ट्रस्टकडून “Urban Wildlife Patrol” मोहिमेची घोषणा
वन्यजीव सप्ताह २०२४ च्या निमित्ताने, पुणे वन विभाग आणि RESQ चॅरिटेबल ट्रस्टने “अर्बन वाईल्डलाईफ पॅट्रोल” Urban Wildlife Patrol हा नागरिकी उपक्रम सुरु करण्याची घोषणा केली आहे. ह्या उपक्रमात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) क्षेत्रातील समृद्ध प्राणी वैविध्याची नोंदणी करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून सहभाग घेण्याचे आव्हान करीत आहोत. ही मोहीम २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत चालेल, ज्यामध्ये नागरिकांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील वन्य जीवांचा शोध घेण्याची आणि वन्यजीव रक्षणाच्या प्रयत्नांमध्ये योगदान देण्याची संधी मिळणार आहे.
“अर्बन वाईल्डलाईफ पॅट्रोल” मोहिमेचे उद्दिष्ट नागरिकांच्या मदतीने पुणे आणि PCMC च्या शहरी आणि उपशहरी भागांमध्ये आढळणाऱ्या वन्य प्रजातींची सविस्तर यादी तयार करणे आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांना स्थानिक वन्यजीवांचे निरीक्षण करून त्यांची नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे, ज्याद्वारे पुणे व आसपासच्या भागातील वन्यप्राणी वैविध्याचा आढावा घेतला जाईल आणि भविष्यातील संरक्षण व पुनर्वसनाच्या प्रयत्नांसाठी माहिती उपलब्ध होईल.
महत्त्वाचे मुद्दे:
नागरिकांना प्राणी, पक्षी, सरीसृप, उभयचर किंवा कीटक अश्या कोणत्याही वन्य प्राण्यांच्या प्रजाती आपल्या भागात दिसल्यास त्यांचा फोटो काढून एका ऑनलाइन डेटा फॉर्मद्वारे अपलोड करता येईल. नागरिकांनी सादर केलेली माहिती एका मोठ्या डेटाबेसमध्ये समाविष्ट केली जाईल, ज्याचा उपयोग भविष्यात वन्यजीवांच्या संवर्धनासाठी केला जाईल.
“आपले शहर वन्यजीवांनी समृद्ध आहे, जे बहुतेक वेळा आपल्याला दिसत नाहीत. हा उपक्रम नागरिकांना वन्यजीवांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये थेट योगदान देण्यासाठी आणि वन्यजीवांची नोंदणी करण्यासाठी महत्त्वाची माहिती गोळा करण्यासाठी प्रोत्साहन देतो.” असे पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते ह्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
हेही वाचा: कारवी – रानफुलांमधील अत्यंत देखणी वनस्पती
अर्बन वाईल्डलाईफ पॅट्रोल मोहिमेचे काही प्रमुख उद्दिष्टे आहेत. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट जैवविविधतेची नोंद करणे आहे, ज्याद्वारे पुणे आणि PCMC च्या शहरी आणि उपशहरी परिसंस्थांमधील प्रजातींची सविस्तर यादी तयार केली जाईल. या माहितीचा उपयोग वन्य जीवांच्या प्रजाती व ते वापरत असलेले अधिवास ह्यची नोंद करण्यास होईल, ज्याद्वारे भविष्यातील संरक्षण आणि पुनर्वसन प्रयत्नांना दिशा मिळेल. याव्यतिरिक्त, समुदायाचा सहभाग या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे, ज्याद्वारे नागरिक आणि स्थानिक वन्यजीवांमध्ये एक नाते निर्माण होईल आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी जबाबदारी वाढेल. डेटाचा वापर करून, मिळालेली माहिती संरक्षण योजना तयार करण्यासाठी वापरली जाईल, ज्यात पुनर्वसन केलेल्या वन्यजीवांना रिलीझ करण्यासाठी योग्य ठिकाणांचा शोध घेता येईल.
RESQ चॅरिटेबल ट्रस्टचे मानव-वन्यजीव संबंध व्यवस्थापनाचे संचालक नचिकेत उत्पात म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की प्रत्येक नागरिकाने वन्यजीव संरक्षणात योगदान देण्याची संधी घ्यावी. या उपक्रमाद्वारे, नागरिक जैवविविधतेच्या संवर्धनासाठी योगदान देऊ शकतात आणि ह्या धकाधकीच्या आयुष्यात विसर पडलेल्या त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील नैसर्गिक सौंदर्याशी पुन्हा एकरूप होऊ शकतात.”
उपक्रमात सहभागी होण्याचे सोपे पाच टप्पे:
- ऑनलाइन फॉर्म https://bit.ly/urbanwildlifepatrol चा २ ऑक्टोबर २०२४ पासून वापर करा.
- कोणतेही वन्यजीव दिसल्यास मोबाईलद्वारे त्यांचा स्पष्ट फोटो घ्या. उच्च दर्जाचे फोटो आवश्यक नाहीत, फक्त प्रजाती स्पष्टपणे ओळखता येईल अशी छायाचित्रे घ्या.
- प्रत्येक वन्यजीव प्रजातीसाठी स्वतंत्रपणे एक ऑनलाइन फॉर्म भरा आणि जागेच्या माहितीसह फोटो अपलोड करा.
- आपले योगदान सादर केल्यावर तुम्हाला १० मिनिटांत तुमच्या योगदानाचे प्रमाणपत्र ईमेलद्वारे मिळेल.
- तुमचा अनुभव सोशल मीडियावर #UrbanWildlifePatrol हा हॅशटॅग वापरून शेअर करा, ज्यामुळे इतरांनाही प्रोत्साहन मिळेल.
मार्गदर्शक तत्त्वे:
- प्राण्यांना आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला त्रास न देता अंतर राखून निरीक्षण करा.
- आपल्या आजूबाजूची काळजी घ्या आणि प्रतिबंधित किंवा असुरक्षित क्षेत्रात जाणे टाळा.
- कोणत्याही प्रकारचे चमकणारे प्रकाश किंवा आवाज करणारी छायाचित्रे घेणे टाळा, ज्यामुळे वन्यजीवांना त्रास होऊ शकतो.
हेही वाचा: ऑपरेशन भेडिया आता महत्त्वाच्या टप्प्यावर
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.