‘निसर्गसेवक’ संस्थेचा वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण संरक्षण व त्याविषयी जनजागृती करणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी ‘निसर्गसेवक’ पुरस्कार Nisargasevak Award दिला जातो. या वर्षीच्या ‘निसर्गसेवक’ पुरस्कारासाठी चिपळूणच्या नीलेश बापट Nilesh Bapat यांची निवड झाली आहे.
दि. ८ एप्रिल २०२३ रोजी संध्या. ५.३० वाजता कै. धोंडूमामा साठे होमिओपॅथिक महाविद्यालय, पुणे येथे हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे १६ वे वर्ष आहे.
मानद वन्यजीवरक्षक नीलेश बापटांनी चिपळूणमधील एका डोंगरावर वृक्षस पक्षी, प्राणी यांनी समृध्द असा वनीकरण प्रकल्प समृद्ध केला आहे. कोयना अभयारण्य वाचविण्यासाठी ते ३५ वर्षे कार्यरत आहेत. वाट चुकलेले अजगर, बिबटे, मगरी यांना ते त्यांच्या अधिवासात सोडतात. पुराच्या संकटात अनेकांना मदत करतात. नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये सतत पर्यावरणरक्षणाविषयी कार्यक्रम करतात. त्यांना ‘निसर्गसेवक’ संस्थेच्या माध्यमातून या कार्यासाठी ‘निसर्गसेवक’ पुरस्कार देण्यात येत आहे.
हेही वाचा: प्रोजेक्ट टायगर च्या पन्नाशी निमित्त ५० रुपयांचे विशेष नाणे
यंदा संस्थेने शाळांसाठी आयोजित केलेल्या ‘पर्यावरण रक्षण पुरस्कार’ स्पर्धेत बक्षीसपात्र ठरलेल्या शाळांच्या पुरस्काराचे वितरणही याच कार्यक्रमात होणार आहे. पुरस्कार शिवाजी विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीरंग यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून ‘वनस्पती खजिन्याचा अभ्यास आणि अभ्यासक’ या विशेषांकाचे प्रकाशनही या कार्यक्रमात होणार असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष विवेक वेलणकर तसेच उपाध्यक्षा डॉ. विनया घाटे यांनी दिली.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.