वन्यजीव अभ्यासक, संशोधक आणि पर्यावरणविषयक मार्गदर्शक धर्मराज पाटील यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे नुकतेच धर्मराज पाटील वसुंधरा साक्षरता केंद्र Dharmaraj Patil Earth Literacy Center सुरु करण्यात आले आहे.
रानावनातले पक्षी आणि फुलपाखरे हा धर्मराज चा अभ्यासाचा मुख्य विषय होता. आययुसीएन या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशन विभागाचे ते सदस्य होते. पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ पक्ष्यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. वन पिंगळा या दुर्मीळ पक्ष्याच्या संशोधनादरम्यान या पक्ष्याचे अस्तित्व असलेल्या नवीन वनक्षेत्रांचा धर्मराज नी शोध लावला होता. धर्मराज नी महाराष्ट्रातील २५ आणि मध्य प्रदेशातील ८ गावांमध्ये त्यांनी लोकसहभागातून जैवविविधता समित्या स्थापन केल्या असून, गावांची जैवविविधता नोंदवही बनविण्यासाठी मदत केली आहे.
हेही वाचा: प्रवीणसिंह परदेशी यांची BNHS च्या अध्यक्षपदी निवड
गेल्या वर्षी एका गंभीर आजारामुळे धर्मराज यांचे निधन झाले. या घटनेला जरी एक वर्ष होऊन गेले असले तरी त्यांनी चालू केलेली कार्य आजही चालू आहेत आणि पुढेही ती चालू राहावी अशी सर्व निसर्ग प्रेमींची मनोमन इच्छा आहे.
धर्माराजच्या स्मरणार्थ निरंजन उपासनी ( रा. नांटे, दापोली ) यांनी त्याच्या नावाने एक वसुंधरा साक्षरता केंद्र सुरू केले आहे.
गेल्या वीस वर्षात पर्यावरण, वन्यजीव, उत्क्रांती, परिसंस्था इ अनेक विषयांवरील पुस्तके आणि एक हजार पेक्षा अधिक माहितीपट यांचा संग्रह उपासनींकडे आहे. वसुंधरा साक्षरता केंद्राची सुरुवात म्हणून निरंजन उपासनी हा संग्रह लोकांना उपलब्ध करून देणार आहे.
तसेच पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास, विषमुक्त जीवनशैली, नदी परिसंस्था, हरित उद्योजकता या क्षेत्रात उपासनी यांनी केलेल्या कामाच्या आधाराने आणि दिशेने या केंद्राची पुढील वाटचाल होईल.
कोकणात जेंव्हा भटकंती कराल तेंव्हा “धर्मराज पाटील वसुंधरा साक्षरता केंद्राला” नक्की भेट द्या. २१ मार्च २०२३ पासून सर्व निसर्गप्रेमींसाठी हे केंद्र खुले आहे.
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधणे : निरंजन उपासनी, मु.पो. नांटे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी – 9623444108
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.