वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या कमी होते आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून चिमण्यांच्या संवर्धनासाठी २० मार्च हा जागतिक चिमणी दिन World Sparrow Day म्हणून साजरा केला जातो.
महंमद दिलावर यांनी २००६ मध्ये नाशिक येथे ‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’ नावाची एक संस्था स्थापन केली. त्यानंतर फ्रान्समधील ‘इकोसिस अॅक्शन फाऊंडेशन’ आणि जगभरातील असंख्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहाय्याने या संस्थेने २०१० पासून ‘जागतिक चिमणी दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली. या संस्थांमार्फत चिमण्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी अभ्यास व त्यांच्या संवर्धनासाठी उपाय आणि वातावरणातील वाढत्या प्रदूषणाचा चिमण्यांवर होणारा परिणाम यासाठी जगभर चळवळ उभारली जात आहे.
हेही वाचा: सर्व अडचणींवर मात करत जखमी शिक्रा पक्ष्याची पुन्हा गगनभरारी
चिमणी दिनाच्या औचित्याने जळगावमधील निसर्गमित्र संस्थेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्यातर्फे येत्या १८ ते २० मार्च या तीन दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन चिमणी गणना उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. लहान व मोठ्या सर्व नागरिकांनी सिटिझन सायंटिस्ट म्हणून कोणत्याही एका दिवशी या चिमणी गणनेत भाग घ्यावा व आपल्या सोयीनुसार शनिवार मार्च १८ ते सोमवार २० या तीन दिवसातील कोणताही एक दिवस निवडून किमान १५ मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त वेळ चिमणी गणना करावी. ही गणना सकाळी ०६.३० ते ०९.३० अथवा दुपारी ०४.३० ते ०६.३० या वेळात करावी असे आवाहन पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी केले आहे.
चिमणी संवर्धन,जतन व जागृती साठी चिमणी गणना घेण्यात येणार आहे तरी नागरिकांनी चिमणी गणनेची लिंक सर्वत्र पाठवावी व चिमणी वाचवा मोहिमेत सहभागी होण्याची विनंती गाडगीळ दांपत्याने केली आहे.
हेही वाचा : रंगबिरंगी फुलपाखरांना मराठमोळी नावं…
चिमणी गणनेत सहभाग घेणार्या व्यक्तीला सहभागाचे प्रमाणपत्र त्यांच्या व्हॉट्सप्प वर पाठवले जाणार आहे. ऑनलाईन चिमणी गणना फॉर्म हा मराठी सोबत इंग्रजी माध्यमात असून सर्व वयोगटातील निसर्गप्रेमी नागरिकांनी यात भाग घ्यावा. ही चिमणी गणना आपल्या अंगणात, गल्लीत, कॉलनीत, बागेत, कार्यालयाच्या परिसरात, संकुलात करता येईल असे गाडगीळ म्हणाले.
चिमणी गणनेत सहभागी होण्यासाठी, फॉर्म ची लिंक: https://forms.gle/MSdePffGKbQduLkJ9
अधिक माहितीसाठी 8999809416 या क्रमांकावर संपर्क करावा.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.