सर्व अडचणींवर मात करत जखमी शिक्रा पक्ष्याची पुन्हा गगनभरारी
सर्व अडचणींवर मात करत जखमी शिक्रा पक्ष्याची पुन्हा गगनभरारी

महाराष्ट्र वन विभागाने जुन्नर शहरातून वाचवलेल्या जखमी Shikra ला Wildlife SOS मधील पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी उपचारानंतर पुन्हा जंगलात सोडण्यात आले. हा पक्षी चार महिने वाइल्डलाइफ  एसओएस संस्थेच्या देखरेखीखाली होता आणि त्याने लक्षणीय सुधारणा केली.

ऑक्टोबर २०२२ मध्ये जुन्नर शहरातील एका घराच्या स्टोअर रूममध्ये एक प्रौढ शिक्रा पक्षी जखमी अवस्थेत आढळला होता. वन विभागाने या पक्ष्याची सुटका केली आणि त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी वाइल्डलाइफ  एसओएसद्वारे चालविल्या जाणाऱ्या माणिकडोह बिबट्या बचाव केंद्रात दाखल करण्यात आले.

वाइल्डलाइफ एसओएस पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या एक्स-रे अहवालात पक्ष्याचा उजवा पंख तुटल्याचे समोर आले. शिक्राला आयुष्यात दुसरी संधी देण्याचा निर्धार करून या टीमने  त्याच्या उपचार आणि काळजीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. 

हेही वाचा : बर्ड मॅन ऑफ ऑफ इंडिया

काही महिन्यांच्या व्यापक उपचारांचे शेवटी फळ मिळाले आणि शिक्रा पूर्णपणे बारा झाला. पक्ष्याची तब्येत जसजशी सुधारत गेली, तसतसे त्याला उड्डाणाचा सराव करता यावा म्हणून त्याला एव्हिअरीमध्ये हलविण्यात आले. 

पुढची पायरी म्हणजे शिक्रा सुरक्षितपणे जंगलात परत जाणे, जो त्याचा मूळ अधिवास आहे. वाइल्डलाइफ  एसओएस पथक आणि वन विभागाने नुकतेच या पक्ष्याला सोडण्यासाठी योग्य अधिवास शोधून काढला आणि पक्षी आपले पंख पसरून पुन्हा एकदा उड्डाण घेत असल्याचे पाहिले. 

वन्यजीव एसओएसचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सावने म्हणाले, ‘एक्स-रे तपासणी केली असता पक्ष्याच्या पंखांला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याचे आढळले. आम्ही सातत्याने त्या पक्ष्याचे निरीक्षण केले आणि त्याची हळूहळू प्रगती पाहिली. आम्ही पट्ट्यांचा वापर करून फ्रॅक्चर झालेल्या पंखाला स्थिर केले आणि बरे होण्याच्या प्रक्रियेस मदत करण्यासाठी पूरक आहारासह औषधे दिली. इतर प्राण्यांकडून तात्काळ धोका निर्माण होऊ नये, यासाठी सुरक्षित अधिवासाचे मूल्यमापन करून शिक्रा सोडण्यात आला.

एसओएसचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक सत्यनारायण म्हणाले, “आमच्या पशुवैद्यकीय पथकाने शिक्राच्या जखमा योग्यरित्या बरे होण्यासाठी सर्वोत्तम वैद्यकीय सेवा प्रदान केली. या पक्ष्याला आता जंगलात आयुष्य जगण्याची दुसरी संधी मिळाली आहे, हे पाहून आम्हाला आनंद झाला आहे.

हेही वाचा: SARISKA व्याघ्र प्रकल्पात येणार अस्वल SLOTH BEAR

शिक्रा (Accipiter Badius) हा शिकारी पक्षी आहे जो ऑक्सिपिट्रिडी नावाच्या कुळातील आहे. शिक्रा हा एक छोटा गोशॉक आहे ज्याची लांबी २५ ते ४५ सेंमी आणि वजन १००-२०० ग्रॅम आहे. मादी वजनाने जास्त म्हणजे १३० ते २६० ग्रॅमपर्यंत असते. या पक्ष्याच्या अनेक उपजाती असून त्यापैकी A.B. Dussumieri आणि A.B. Cenchroides  या उपप्रजाती संपूर्ण भारतात आढळतात.

शिक्रा परिसंस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बाजावतो कारण तो सरडे, लहान सस्तन प्राणी, बेडूक, लहान पक्षी आणि कीटक यांवर जगतो. पानझडी जंगले, गवताळ प्रदेश, शेतजमीन आणि अगदी शहरी भागातही राहणारा हा एक अनुकूल पक्षी आहे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!