Krishna Mckenzie Auroville भारतीय परंपरांची ब्रिटिश कृष्णाला भूरळ
भारतीय परंपरांची ब्रिटिश कृष्णाला भूरळ

मूळचे ब्रिटनचे (हॅम्पशायर) असलेले कृष्णा मॅकेंझी Krishna Mckenzie वयाच्या एकोणिसाव्या वर्षी भारतात आले आणि इथली पर्यावरणस्नेही संस्कृती आणि परंपरांच्या ते प्रेमात पडले. साधारण १९९३ चे वर्ष असेल ते… त्या काळात मोबाईल, इंटरनेट काहीही नव्हते. त्यामुळे कृष्णांनी मनसोक्त भटकंती केली. ब्रिटनमध्ये जे. श्रीकृष्णमूर्ती शाळेत शिक्षण झाल्याने भारताविषयी आकर्षण होतेच. तमिळनाडूतील ऑरोव्हिल Auroville फिरताना त्यांनी शेती पद्धती जाणून घेतली. एवढ्यावरच न थांबता वंदना शिवा यांच्या डेहेराडूनमधील शेताला भेट देऊन भारतातील नैसर्गिक शेती जाणून घेतली. या पुढे आपली कर्मभूमी  म्हणजे ऑरोव्हिल, असा निर्णय घेऊन तमिळनाडूमध्ये स्थायिक झालेले कृष्णा मॅकेंझी आज अनेक तरुणांसाठी आदर्श ठरले आहेत.

उत्तम गायक, वादक, कलाप्रेमी असलेले पर्यावरणप्रेमी कृष्णा मॅकेंझी ऑरोव्हिल मध्ये शेती करतातच, त्यांच्या खाद्य पदार्थांच्या ऑरगॅनिक डिशही लोकप्रिय आहेत. पाँडिचेरी येथील ऑरोविल येथील सॉलिट्यूड फार्म आणि ऑरगॅनिक किचनची ते संस्थापक आहेत.  त्यांच्या या कार्याचे कौतूक करण्यासाठी गेल्या महिन्यात त्यांना किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवात ‘वसुंधरा सन्मान’ हा पुरस्कार देण्यात आला.

पुण्यातील तरुणांशीही त्यांनी मोकळेपणाने संवाद साधला.  

Krishna Mckenzie Auroville
Krishna Mckenzie

विविध रुढी आणि परंपरांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीत निर्सगाशी जी एकरूपता साधली गेली आहे. त्यामुळे भारतात मानवी संस्कृती अधिक समृद्ध आणि वृ्द्धिंगत झाल्याचे दिसून येते. स्थानिक पातळीवर उत्पादित अन्नाचा सन्मान करणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा सन्मान करण्याच्या बरोबरीचे आहे. स्थानिक पातळीवर उत्पादित होणारे अन्ने हे शिजविण्याच्या पद्धती पासून ते खाण्याच्या पद्धती पर्यंत वैशिष्टपूर्ण असल्याने स्थानिक पातळीवर उत्पादित होणारे पीक ही आपली सांस्कृतीक ओळख आहे,  असे मत कृष्णा मॅकेंझी यांनी व्यक्त केले.

पाश्चात्य देश भारतातील कला, संस्कृती, हस्तकला, चित्रकला, मूर्तीशास्त्र, लोककला, अध्यात्म, नृत्य, वास्तूकला, वैविध्यपूर्ण भाषा आदी घटकांपासून प्रचंड प्रभावित आहेत. भारताची ही विविधतेतील एकरुपता मला प्रचंड भावते. या एकरुपतेबाबत आश्चर्यही वाटते.

कृष्णा मॅकेंझी

आपल्या आहाराबद्दल आपण जागृक आणि सजग असण्याची गरज आहे. आपण जे अन्न म्हणून खात आहोत ते  पोषक मूल्यांनी युक्त आहे की नाही याची चाचपणी करणे आवश्यक झाले आहे. मानव निसर्ग ओरबाडून स्वतःचे अस्तित्व तात्पुरत्या स्वरुपात सुरक्षित करु पाहतो आहे, परंतू या नादात तो येणाऱ्या पिढीचे आणि पृथ्वीचे दिर्घकालीन नुकसान करत आहे. आपले निसर्गाशी असलेले नातं संपुष्टात येत असून पाणी, माती, हवा सर्वच घटक मनुष्याने प्रदूषित करून ठेवले आहेत. कृष्णा मॅकेंझी म्हणाले की, भारतात तुलनेने आजही स्थानिक पातळीवर जे अन्न पिकवले जाते तेच खाल्ले जाते. तसेच विविध सण-उत्सव पंरपरांच्या निमित्ताने आणि विविध ऋतुमानांनुसार खान-पानात विविधता आणली जाते.

हेही वाचा: भरडधान्य (MILLETS) आपल्या अन्नसाखळीचा अविभाज्य भाग बनणे गरजेचे

आयात केलेल्या फळ-भाज्यांच्या तुलनेत स्थानिक पातळीवर उत्पादन होणारे अन्न हे तुलनेने कमी प्रतीचे असते, असा गैरसमज सर्वसाधारणपणे दिसून येतो. स्थानिक पातळीवर ते मोठ्या स्तरावर उत्पादीत होत असल्याने आणि समाजातील सर्व घटकांतील नागरिकांना ते सहज विकत घेता येत असल्याने त्याची स्थानिक बाजारपेठेतील किंमत कमी केली जाते, हे चुकीचे आहे.  स्थानिक पातळीवर उपलब्ध होत असलेल्या अन्नामुळे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पातळीवर सुसूत्रता साधत असते. या तीन घटकांसह स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध होणारे हे अन्न पर्यावरणीय पातळीवर देखील सुसूत्रता साधत असते.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!